शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात गुंतवणुकीस ‘फॉक्सकॉन’चा नकार

By admin | Updated: October 28, 2016 01:56 IST

‘आयफोन’सारख्या नामांकित ब्रॅण्डचे उत्पादन करणाऱ्या फॉक्सकॉन या आंतरराष्ट्रीय कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास चक्क नकार दिल्याने राज्य सरकारचा

मुंबई : ‘आयफोन’सारख्या नामांकित ब्रॅण्डचे उत्पादन करणाऱ्या फॉक्सकॉन या आंतरराष्ट्रीय कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास चक्क नकार दिल्याने राज्य सरकारचा हिरमोड झाला आहे. मुंबईत झालेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात या कंपनीने सरकारसोबत ५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा करार केला होता. तैपईस्थित फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्र मोठी गुंतवणूक करणार होती. त्यासाठी या कंपनीला सरकारने मुंबईनजिक १५०० एकर जमीन देऊ केली होती. या कंपनीसोबत सामंजस्य करार झाल्यानंतर सरकारने मोठा गाजावाजा केला होता. ५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीतून राज्यात ५० हजार जणांना रोजगार मिळेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.मात्र, जागतिक मंदीमुळे उत्पादनास पुरेसा उठाव नसल्याचे कारण पुढे करत फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास असमर्थता दर्शविल्याचे समजते. या माहितीस उद्योग खात्यातील सुत्रांनी दुजोरा दिला. (विशेष प्रतिनिधी)सरकारचा दावा फोल-चव्हाणविकासाचे सातत्याने अतिरंजित चित्र रंगवणाऱ्या सरकारने फार गाजावाजा करुन राज्यात फॉक्सकॉन या आंतरराष्ट्रीय कंपनीबरोबर ५ अब्ज डॉलरचा करार झाल्याचा दावा केला होता. परंतु हा दावा फोल ठरला असून सरकारने फॉक्सकॉनच्या गुंतवणुकीचे खरे वास्तव जनतेसमोर मांडावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.