शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

चौथा नेपाळी आरोपी अटकेत

By admin | Updated: January 17, 2017 06:07 IST

मणप्पूरम गोल्ड लोन फायनान्सच्या उल्हासनगर शाखेतून जवळपास सात कोटी रुपयांचे सोने चोरणाऱ्या टोळीतील चौथ्या नेपाळी आरोपीस ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली.

राजू ओढे,

ठाणे- मणप्पूरम गोल्ड लोन फायनान्सच्या उल्हासनगर शाखेतून जवळपास सात कोटी रुपयांचे सोने चोरणाऱ्या टोळीतील चौथ्या नेपाळी आरोपीस ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याच्या चौकशीतून टोळीतील इतर सदस्यांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत होणार आहे.२६ डिसेंबर २०१६ रोजी मणप्पूरम गोल्ड फायनान्सच्या उल्हासनगर शाखेच्या भिंतीला भगदाड पाडून सात कोटी २२ लाखांचे सोने एका टोळीने लंपास केले होते. ४ जानेवारी रोजी पोलिसांनी याप्रकरणी कमरुद्दीन असुद्दीन शेख आणि मनोज नुरबहादूर सुद यांना अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मुस्तफा ऊर्फ अख्तर शमशेर शेख याला नवी मुंबईतील तुर्भे येथून अटक केली. या आरोपींच्या चौकशीतून आणखी एका आरोपीचे नाव समोर आले. त्यानुसार, नेपाळचा रहिवासी खडकसिंग याला ठाण्याच्या गुन्हे शाखा-घटक १ च्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. गुन्हे शाखेने या आरोपीस तपास अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. खडकसिंगने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. खडकसिंगने या गुन्ह्यात वाहनचालकाचे काम केले होते. चोरलेल्या सोन्यामध्ये त्यालाही वाटा मिळाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या टोळीत आणखी काही आरोपी असून अटक आरोपींच्या चौकशीतून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा करीत आहे. (प्रतिनिधी) >सोने जप्तीचे आव्हान : मणप्पूरमच्या उल्हासनगर शाखेतून तब्बल ७ कोटी २२ लाख रुपये किमतीचे जवळपास २८ किलो सोने चोरी गेले होते. पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असली तरी त्यांच्याकडून केवळ ३ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. आता उर्वरित आरोपींच्या अटकेसोबतच चोरीचे सोने जप्त करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.