शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पवार कुटुंबीयातील चौथी पिढी राजकारणात

By admin | Updated: February 7, 2017 00:17 IST

बारामतीतून अजित पवार यांचे चुलत पुतणे रोहित पवार यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केली आहे.

पुणे/बारामती : जिल्हा परिषदेच्या आखाड्यात नेत्यांची नवीन पिढी उतरली आहे. बारामतीतून अजित पवार यांचे चुलत पुतणे रोहित पवार यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केली आहे. भारतीय जनता पार्टीही यात मागे नसून शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे यांचा मुलगा राहुल न्हावरे गटातून रिंगणात उतरला आहे.

रोहित पवार यांनी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ-गुणवडी या गटातून अर्ज दाखल केला आहे. पवार कुटुंबीयाची चौथी पिढी या निमित्ताने राजकारणात उतरली आहे. शरद पवार यांचे थोरले बंधू कृषितज्ज्ञ कै. दिनकरराव उर्फ आप्पासाहेब पवार यांचे रोहित पवार नातू आहेत. शरद पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार लोकल बोर्डाच्या सदस्या म्हणून राजकारणात होत्या. त्यानंतर शरद पवार मागील ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत.

अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यानंतर रोहित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुणे महापालिकेसाठी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ हे निवडणूक लढवित आहेत. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातून ते रिंगणात आहेत. अनिल शिरोळे यांनी खासदारकीच्या अगोदर सुमारे २० वर्षे महापालिकेत पक्षाचे प्रतिनिधित्व केले होते. बीई मॅकॅनिकल इंजिनीअर असलेले सिद्धार्थ यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून कार्यरत होते. माजी आमदारांची दुसरी पिढीही राजकारणातभोर : भोर तालुक्यातील दोन माजी आमदारांची दुसरी पिढी जिल्हा परिषदेच्या राजकारणात उतरत आहे. कॉँग्रेसचे माजी आमदार संपतराव जेधे यांचे चिरंजीव रोहिदास जेधे उत्रौली-कारी गटातून राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. माजी आमदार शिवाजीराव शिवथरे यांचे चिरंजीव रणजितही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवित आहेत.आमदार पाचर्णे यांचे पुत्र रिंगणातभाजपाचे शिरूर तालुक्याचे आमदार बाबुराव पाचर्णे यांचे पुत्र राहुल पाचर्णे शिरुर ग्रामीण-रांजणगाव गटातातून सध्या अपक्ष जिल्हा परिषद सदस्य आहेत. या निवडणुकीत शिरूर ग्रामीण न्हावरे या गटातून निवडणूक लढवत आहे. राहुल पाचर्णे हे इस्ट्रूमेंन्टेशन अ‍ॅण्ड कंट्रोल या शाखेतून अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर आहेत. याबरोबरच त्यांनी पुण्यातील सिंहगड महाविद्यालयातून एमबीएची पदवी घेतली आहे. ते बांधकाम व्यावसायिक असून, गेल्या ५ ते ७ वर्षांपासून राजकारणात कार्यरत आहेत. शिरुर ग्रामीण-रांजणगाव गटातून ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यापूर्वी निवडून आले आहेत.

वळसे यांचे राजकीय वारसही उतरलेविधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे राजकीय वारस त्यांचे पुतणे विवेक वळसे-पाटील आंबेगाव तालुक्यातील परगांवतर्फे अवसरी बुद्रूक/ अवसरी बुद्रूक या गटातून निवडणूक लढवत आहेत. विवेक हे राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष असून, खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून तालुक्यात संघटना बांधली.