शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

By admin | Updated: March 2, 2015 01:54 IST

शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला़ मृतांमध्ये पती, गर्भवती पत्नी व दोन चिमुकल्यांचा

नांदेड : शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला़ मृतांमध्ये पती, गर्भवती पत्नी व दोन चिमुकल्यांचा समावेश आहे़ ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास नांदेड शहरानजीक गाडेगाव रस्त्यावरील मुजाहिद चौक परिसरात घडली़ शेख समद शेख हुसेन (२६), शेख आसमा बेगम शेख समद (२४), शेख जोहा शेख समद (३) आणि शेख बिलाल (२) अशी मृतांची नावे आहेत़ फातेमा हायस्कूलजवळ शेख समद यांचे घर आहे़ शनिवारी रात्री घरातील सर्वजण झोपेत होते़ पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक घराला आग लागली. काही समजण्यापूर्वीच आगीने रौद्ररूप धारण केले़ यात शेख समद शेख हुसेन, शेख आसमा बेगम शेख समद (२४) यांचा जागीच मृत्यू झाला़ गंभीर भाजलेला शेख बिलालचा रुग्णालयात नेताना, तर, शेख जोहाचा जिल्हा रुग्णालयात दुपारी एकच्या सुमारास मृत्यू झाला़ आगीचे नेमके कारण हे अद्याप समजू शकले नाही. मात्र घरातील दूरचित्रवाणी संच जळालेले दिसत असल्याने शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला़ (वार्ताहर)