शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षीय चिमुकलीने काढली वडिलांच्या मृतदेहाजवळ रात्रं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 17:19 IST

अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या वडिलांच्या मृतदेहाजवळच चारवर्षीय चिमुकलीने अख्खी रात्रं काढली. ही हृदयदायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.

ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. १७  : अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या वडिलांच्या मृतदेहाजवळच चारवर्षीय चिमुकलीने अख्खी रात्रं काढली. ही हृदयदायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. मोताळा तालुक्यातील टाकळी घडेकर येथील किशोर आत्माराम घडेकर (वय २८) यांना १६ आॅक्टोबर रोजी मुलगा झाला. आपल्या नवजात शिशुला पाहण्यासाठी व पत्नीला भेटण्यासाठी किशोर घडेकर हे कु.काजल नामक चार वर्षीय चिमुरडीला सोबत घेऊन एमएच२८-वाय९३४ या क्रमांकाच्या दुचाकीने रविवारी सायंकाळी मौजे गौलखेड गावाकडे निघाले होते.

दरम्यान, मलकापूर शहराबाहेरील बोदवड मार्गाने जात असताना त्यांच्या दुचाकीस रात्रीच्यावेळी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांची दूचाकी रस्त्याच्या कडेला झाडाडुडपात फेकल्या गेली. या अपघातात किशोर घडेकर यांचे निधन झाले. तर सोबत असलेल्या त्यांच्या चार वर्षीय चिमुरडीला पित्याच्या मृतदेहाजवळच अख्खी रात्र काढावी लागली. पित्याचा मृत्यू झाल्याची बाब त्या चिमुरडीला कळली नाही. या परिसरात रात्री वर्दळ क्वचीतच असल्याने घडलेला प्रकार रात्री समोर आलाच नाही. ही बाब सोमवारी सकाळी रस्त्याने जाणाऱ्या एका दुध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याच्या निदर्शनास आली.

दुधविक्रेत्याने सदर माहिती नगरसेवक अ‍ॅड. हरीश रावळ व गजानन ठोसर यांना कळविली. त्यामुळे घटनास्थळावर एकच गर्दी झाली. किशोर घडेकर यांचा मृतदेह आणि जखमी अवस्थेतील काजलला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कु.काजलच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर निघाल्याने तिच्यावर मानस हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मृतकाचा भाऊ ईश्वर आत्माराम घडेकर (वय २५) रा.टाकळी घडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात वाहनाविरूध्द अप.नं.३६१/१६ कलम ३०४ अ २७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय सुधाकर गवारगुरू व पोकाँ मनोज चव्हाण करीत आहेत.