शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

चार शिक्षक आमदारांना पगारवाढही नको

By admin | Updated: January 15, 2017 02:18 IST

राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याने, त्याचा निषेध म्हणून चार शिक्षक आमदारांनी वेतनवाढच नव्हे, तर वेतनही न घेण्याची घोषणा सोमवारी येथे केली.

पुणे : राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याने, त्याचा निषेध म्हणून चार शिक्षक आमदारांनी वेतनवाढच नव्हे, तर वेतनही न घेण्याची घोषणा सोमवारी येथे केली. याशिवाय रामनाथ मोते आणि कपिल पाटील यांनी पगारवाढ नाकारत असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षण आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शिक्षक आमदार विक्रम काळे, दत्तात्रय सावंत, डॉ. सुधीर तांबे आणि श्रीकांत देशपांडे सहभागी झाले होते. शिक्षण आयुक्तालयासमोर झालेल्या सभेमध्ये काळे यांनी वेतन न घेण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, ‘शिक्षकेतर आकृतीबंधाबाबत नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालाकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, तसेच इतर मागण्या आश्वासन देऊनही मान्य केल्या जात नाहीत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत होऊ लागला आहे. त्यामुळे आम्ही चार शिक्षक आमदारांनी वेतनवाढच नव्हे, तर वेतनही न घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण हक्क कायदा लागू झालेला असला, तरी त्यातील तरतुदींकडे कानाडोळा केला जात आहे, असे डॉ. तांबे यांनी सांगितले. कारभार स्वीकारल्यानंतर शासनाकडे पैसे नाहीत, असे मंत्री म्हणत आहेत, पण एकदा जबाबदारी स्वीकारली आहे, तर शिक्षणातील प्रश्न वाढू देऊ नका, असे देशपांडे व सावंत म्हणाले. दरम्यान, आमदारांच्या वेतनवाढीविरोधात हायकोर्टात याचिका करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)...ही स्टंटबाजी तर नाही ना; शिक्षकांना शंकाआ. विक्रम काळे आणि सुधीर तांबे यांची मुदत येत्या तीन-चार महिन्यांत संपत आहे. त्यामुळे निवडणुका डोळ््यासमोर ठेऊन केली जाणारी ही स्टंटबाजी तर नाही ना, अशी शंका शिक्षकांमधून उपस्थित केली जात आहे.पगारवाढ नाकारत असल्याचे जाहीर करणारे रामनाथ मोते यांची मुदतही डिसेंबरमध्येच संपत आहे. शिक्षण हक्क तरतुदींकडे कानाडोळा केला जात आहे, असे डॉ. तांबे यांनी सांगितले. शासनाकडे पैसे नाहीत, असे मंत्री म्हणत आहेत, पण एकदा जबाबदारी स्वीकारली आहे, तर शिक्षणातील प्रश्न वाढू देऊ नका, असे देशपांडे म्हणाले.