शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगराध्यक्ष सचिन शेळके हत्येप्रकरणी चार जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 09:43 IST

नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष सचिन शेळके हत्येप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे

ऑनलाइन लोकमत
पिंपरी चिंचवड, दि. 17 : नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष सचिन शेळके हत्येप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे.  रविवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास खांडगे पेट्रोल पंपासमोर हल्लेखारांनी सचिन शेळके यांच्यावर हल्ला करुन निघृण खून हत्या केली होती. पूर्ववैमनस्यातून सचिन शेळकेंचा खून केल्याच्या आरोपाखाली श्याम रामचंद्र दाभाडे याच्यासह दहा जणांवर भारतीय दंड विधान कलम 302, 34 भारतीय आर्म्स अॅक्ट 352, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंटी दाभाडे, खंडू पचपिंड, संदीप पचपिंड आणि आकाश लोखंडे या चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
 
नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रकार घडल्यामुळे तळेगावमध्ये तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव स्टेशन येथे सचिन शेळके रविवारी सकाळी अकराच्या सुमारास विरोधी पक्षनेते सुनील शेळके यांची भेट घेतल्यानंतर कारने खांडगे पेट्रोल पंपाच्या दिशेने निघाले होते.
 
सव्वा अकराच्या सुमारास पेट्रोल पंपासमोरच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तसेच सत्तूरीने वार केले आणि हल्लेखोर पळून गेले. दरम्यान ही घटना पाहणाऱ्या नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या शेळकेंना पवना हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचरादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
तळेगाव बाजारपेठ बंद
या घटनेनंतर तळेगाव दाभाडे परिसरात मोठ्याप्रमाणावर तणावाचे वातावरण असून तळेगाव दाभाडेची बाजारपेठ बंद केली आहे. पुण्यातील ससुन रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच या घटनेचा निषेध करण्यासाठी आमदार बाळा भेगडे यांनी संपूर्ण मावळ बंदचे आवाहन केले आहे.
 
घटनास्थळी सापडली काडतुसे
मोठ्याप्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. हल्लेखोरांनी प्रथम हवेत गोळीबार केला. त्यामुळे घटनास्थळी जीवंत चार काडतुसे सापडली आहेत. तळेगाव दाभाडे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शेळके यांची खून झाल्याने तनाव निर्माण झाला आहे.
 
माजी नगराध्यक्ष सचिन शेळके
कार्यकर्ता ते नगराध्यक्ष अशी सचिन शेळके यांची वाटचाल आहे. तळेगाव स्टेशन येथे शेळकेवस्ती येथे शेळके यांचे निवासस्थान असून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख असून प्रभाग एक मधून एकदा निवडूण आले आहेत. तसेच भारतीय जनता पक्षांचे शहराध्यक्षपद भूषविले आहे. तसेच नगरसेवक, उपनगराध्यक्ष, प्रक्षप्रतोद आणि २००९- २०१० मध्ये त्यांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे. प्रभाग क्रमांक एक मधून शेळके निवडणूकीसाठी इच्छुक होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी, आई-वडील, तीन भाऊ, दोन मुली असा परिवार आहे.