शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

परमार आत्महत्येतील चार आरोपी पुन्हा रिंगणात

By admin | Updated: February 5, 2017 01:20 IST

राज्यभर गाजलेल्या बांधकाम व्यावसायिक सुरज परमार आत्महत्या प्रकरणात ज्या चार नगरसेवकांना अटक झाली, ते चौघेही आता पुन्हा निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.

ठाणे : राज्यभर गाजलेल्या बांधकाम व्यावसायिक सुरज परमार आत्महत्या प्रकरणात ज्या चार नगरसेवकांना अटक झाली, ते चौघेही आता पुन्हा निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि अपक्ष सुधाकर चव्हाण यांचा त्यात समावेश आहे. मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या डायरीत महापालिकेतील या चार नगरसेवकांची नावे पुढे आली होती. त्यानंतर, पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी दोन ते तीन महिने न्यायालयीन कोठडीत घालवले होते. आता हेच चेहरे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सुधाकर चव्हाण यांनी, तर निवडणूक लढवण्यासाठी भाजपामध्ये जाण्याचा विचारही केला होता. परंतु, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर झाल्याने आणि त्यांच्या नावाला भाजपामधूनच विरोध होऊ लागल्याने त्यांचा पक्ष प्रवेशाचा पत्ता कापला गेला होता. त्यानंतर, आता त्यांनी प्रभाग क्रमांक-५ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या ठिकाणी भाजपाने कमकुमत उमेदवार दिलेला आहे. तर, हणमंत जगदाळे यांनी प्रभाग क्र. ६ मधून, विक्रांत चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक ७ मधून आणि नजीब मुल्ला यांनी प्रभाग क्र. १० मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता मतदारराजा त्यांना कितपत साथ देतो, हे आता येणारा काळ ठरवणार आहे.