सोलापूर : निवासी डॉक्टरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुनील घाटे यांच्यासह चौघांवर सदर बझार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. डॉ. एस. एस. सरवदे, डॉ. निलोफर भैरी, डॉ. सचिन बंदीछोडे अशी गुन्हा दाखल झालेल्या सहयोगी प्राध्यापकांची नावे आहेत. डॉ. किरण जाधव हा वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना विभाग प्रमुखासह चारही सहयोगी प्राध्यापक चारचौघात त्याला त्याच्या समाजावरून अपमानित करीत असत. त्याशिवाय ‘आम्ही सांगितलेली कामे तू वेळेत करत नाहीस, तुला नापास करतो’ असे धमकावून त्याचा सातत्याने मानसिक छळ केला. या छळास कंटाळून डॉ. जाधव याने शनिवारी सायंकाळी शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या रुममध्ये विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. (प्रतिनिधी)
विभाग प्रमुखासह चार डॉक्टरांवर गुन्हा
By admin | Updated: August 18, 2014 02:51 IST