शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

चार डॉक्टरांना व्यवसायबंदीची शिक्षा

By admin | Updated: October 16, 2015 03:59 IST

तामिळनाडूमधील एका वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळावी, यासाठी लाखो रुपयांचा मोबदला घेऊन, प्रत्यक्षात तेथे काम न करताही अध्यापकपदांच्या केवळ कागदोपत्री बनावट नियुक्त्या

मुंबई : तामिळनाडूमधील एका वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळावी, यासाठी लाखो रुपयांचा मोबदला घेऊन, प्रत्यक्षात तेथे काम न करताही अध्यापकपदांच्या केवळ कागदोपत्री बनावट नियुक्त्या स्वीकारणाऱ्या महाराष्ट्रातील चार डॉक्टरांवर व्यवसायबंदीची कारवाई करण्याच्या मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी शिक्कामोर्तब केले.यामुळे ज्या डॉक्टरांना पुढील चार/पाच वर्षे वैद्यकीय व्यवसाय करण्यास बंदी लागू झाली आहे, त्यात डॉ. शशिकांत पटेल, डॉ. शालिक भाऊराव अडे, विष्णूप्रसाद मधुसूदन बापट आणि डॉ. अस्मिता देशमुख यांचा समावेश आहे. यापैकी डॉ. पटेल मुंबईचे, डॉ. बापट पुण्याचे, तर अन्य दोन डॉक्टर राज्याच्या इतर जिल्ह्यांतील आहेत.मेडिकल कौन्सिलने या डॉक्टरांना नोटिसा काढल्या व त्यांचे म्हणणे एकून घेतले. या डॉक्टरांनी आपल्या या वर्तनाने बोगस मेडिकल कॉलेजला मान्यता मिळण्यास हातभार लावला. त्यांचे हे वर्तन कौन्सिलने डॉक्टरांसाठी ठरवून दिलेल्या नीतिसंहितेच्या विरुद्ध आहे, असा निष्कर्ष कौन्सिलच्या एथिक्स समितीने काढला व या डॉक्टरांची व्यवसायाची सनद चार ते पाच वर्षांसाठी रद्द करण्याची शिक्षा त्यांना केली. कौन्सिलच्या गव्हर्निंग बोर्डानेही ही शिक्षा कायम केली.कौन्सिलच्या या निर्णयाविरुद्ध आधी डॉ. अडे, डॉ. बापट व डॉ. देशमुख यांनी याचिका केल्या, पण सुरुवातीस न्यायालयाने त्यांना कोणताही अंतरिम दिलासा दिला नव्हता. नंतर डॉ. पटेल यांनी याचिका केली व त्यात फेब्रुवारी २०१३ मध्ये कौन्सिलच्या निर्णयास अंतरिम स्थगिती दिली गेली. कालांतराने हाच अंतरिम आदेश इतरही तीन डॉक्टरांच्या याचिकांमध्ये दिला गेला. त्यामुळे सनद कायम राहून हे चारही डॉक्टर व्यवसाय करू शकत होते. मात्र, न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने आता त्यांच्या याचिका फेटाळल्याने, त्यांना व्यवसायबंदी लागू होईल.एखाद्या व्यक्तीकडे सनदशीर मार्गाने मिळविलेली वैद्यकीय अर्हता असूनही अशा प्रकारच्या अनैतिक वर्तनामुळे त्यांना डॉक्टरकी न करण्याची शिक्षा दिली जाणे विरळा. यावरून देशात वैद्यकीय शिक्षणाचा कसा बाजार मांडला गेला आहे व त्यासाठी डॉक्टर कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतात, हेच स्पष्ट होते. (विशेष प्रतिनिधी)>>कौन्सिलची तपासणी होण्याच्या एक आठवडा आधी डॉ. पटेल यांना अधिष्ठाता पदावर नेमले गेले होते व इतर तिघांना विविध विषयांचे प्राध्यापक म्हणून नेमले होते. प्रत्यक्षात कॉलेजात येऊन शिकवायचे नाही. फक्त चेन्नईला येऊन नियुक्तीची कागदोपत्री औपचारिकता पूर्ण करायची, याची या डॉक्टरांना आधीच स्पष्ट कल्पना दिली गेली होती व या बदल्यात त्यांना काही लाख रुपये रोखीने देऊन, ती रक्कम कागदोपत्री त्यांना दिलेला पगार म्हणून दाखविली गेली होती. >>मेडिकल कौन्सिलचे त्यावेळचे गुजरातचे अध्यक्ष डॉ. केतन मेहता यांच्या कार्यकाळात देशभरात अशा प्रकारे प्रत्यक्षात कोणत्याही सोईसुविधा नसलेल्या अनेक वैद्यकीय महाविद्यालयांना पैसे घेऊन मान्यता दिल्याचे उघड झाले होते. त्यावरून डॉ. मेहता यांना अटक होऊन, त्यांची अध्यक्षपदावरूनही हकालपट्टी केली गेली होती.>>तामिळनाडूतील मेलवरुवथूर येथीलआदिशक्ती मेडिकल कॉलेजची मेडिकल कौन्सिलने मान्यता देण्यासाठी तपासणी केली, तेव्हा तेथे निकषांची पूर्तता करण्यासाठी देशाच्या विविध शहरांत व्यवसाय करणाऱ्या एकूण ३२ डॉक्टरांची केवळ कागदोपत्री अध्यापक म्हणून नियुक्ती केल्याचे मार्च २०१० मध्ये उघड झाले होते. त्यात या चार डॉक्टरांचा समावेश होता.