शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा अपघातात चौघांचा मृत्यू

By admin | Updated: September 11, 2016 03:52 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोटारीची कंटेनरला धडक बसून चार जण जागीच मृत्यूमुखी पडले. लोणावळ्यातील वलवण महाविद्यालयाजवळ शनिवारी मध्यरात्री

लोणावळा (पुणे ) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोटारीची कंटेनरला धडक बसून चार जण जागीच मृत्यूमुखी पडले. लोणावळ्यातील वलवण महाविद्यालयाजवळ शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला.मृतांमध्ये मुंबई काळाचौकीचे पोलीस हवालदार राजेंद्र विष्णू चव्हाण (वय ४७, मरोळ पोलीस मुख्यालय, बक्कल नं. ३२१८१), त्यांची पत्नी साक्षी उर्फ वनिता राजेंद्र चव्हाण (वय ४२, दोघेही रा. ४०३ मारुती अपार्टमेंट, दत्तपाडा, बोरीवली (पू.) मुंबई), शंकर मारोती वनगुले (वय ३३) व त्यांची पत्नी पूजा शंकर वनगुले (वय २६, दोघेही रा. सोनघर, ता. महाड, जि. रायगड) याचा समावेश आहे.खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात येत होती. चालक राजेंद्र चव्हाण यांचे नियंत्रण सुटल्याने ती कंटेनरला मागून जोरात धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, मोटार जवळपास ४ फूट कंटेनरच्या खाली घुसली. त्यामुळे मोटारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. पनवेल विभागाचे महामार्ग पोलीस निरीक्षक अजित बारटक्के विशेष कारवाई मोहिमेची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांनी हा अपघात पाहिला. त्यांनी तातडीने खंडाळा महामार्ग पोलिसांना घटनास्थळी बोलावून मदतकार्य केले. अपघाताबाबत संभ्रमावस्थाराजेंद्र चव्हाण हे गणपती उत्सवाकरिता त्यांच्या गावी दापोलीला गेले होते. शुक्रवारी गौरीपूजनानंतर सायंकाळी ६.३० वाजता ते सपत्नीक मुंबईला परत निघाले होते. ते एक्स्प्रेस हायवेवर लोणावळ्याकडे कसे आले? तसेच वनगुले दाम्पत्य त्यांच्या गाडीत कसे आले, याबाबत नातेवाईक, तसेच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम असून, त्याचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.वाहनांचा अतिवेग जीवघेणा ठरत आहे. खबरदारी घेतल्यास हे मानवनिर्मित अपघात टाळता येऊ शकतात, असे मत महामार्ग पोलीस अधीक्षक अजित तांबे यांनी व्यक्त केले.गणपतीचे दर्शन घेऊन निघालेल्या पोलिसासह पत्नीचा मृत्यूगावच्या गणपतीचे दर्शन घेऊन मुंबईकडे बंदोबस्ताला हजर राहण्यासाठी निघालेल्या पोलिसाच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्याच्यासह पत्नीचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात शोककळा पसरली आहे. मुळचे दापोलीचे असलेले राजेंद्र विष्णू चव्हाण (४७) हे पत्नीसोबत बोरीवली दत्त पाडा येथे राहायचे. ते मरोळ मुख्यालयात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते. ते गणपतीसाठी गावी गेले होते. शनिवारी माऊंट मेरीच्या बंदोबस्तासाठी हजर राहण्यासाठी त्यांना फोन आला. ते पत्नी वनीतासोबत निघाले. वाटेतच त्यांनी शंकर मारुती वेणगुळे, पूजा वेणगुळे यांना लिफ्ट दिली. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरच्या धडकेत त्यांच्या कारचा अपघात झाला. ही धडक ऐवढी भिषण होती की सँट्रो गाडी जवळपास ४ फुट कंटेनरच्या खाली घुसल्याने आतमध्ये बसलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.