शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

चार कृषी केंद्रांचे परवाने निलंबित!

By admin | Updated: December 27, 2016 02:31 IST

अनुदानित बियाणे वाटप घोटाळय़ातील दोषी महाबीजचे वितरक रडारवर.

अकोला, दि. २६- शासनाने शेतकर्‍यांसाठी अनुदानित दराने दिलेल्या हरभरा बियाणे विक्रीत घोटाळा केल्याप्रकरणात अकोला शहरातील दीपक, संजय, किसान, जय बजरंग या चार कृषी सेवा केंद्रांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित केल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी.ममदे यांनी बुधवारी दिले. आता महाबीजने हजारो क्विंटल हरभरा बियाणे दिलेले चार वितरक रडारवर असून, लवकरच त्यांच्यावरही कारवाईचे संकेत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील ३४ कृषी सेवा केंद्रांनाही नोटिस बजावण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनीही दिला आहे. ह्यलोकमतह्णने अनुदानीत बियाणे विक्रीत मोठा घोटाळा झाल्याचे प्रकरण सातत्याने लावून धरले होते, हे विशेष. कडधान्य उत्पादनासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन म्हणून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत हरभरा बियाण्यासाठी अनुदान ठरवण्यात आले. त्यानुसार शासनाने महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको या उत्पादक कंपन्यांना अनुदानित बियाणे वाटपासाठी मागणी आदेश दिले. रब्बी पेरणीपूर्वी बाजारात बियाणे उपलब्ध करण्याचे सांगितले. त्यानुसार महाबीजने अकोला जिल्ह्यात २४ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान दिलेल्या बियाणे वाटपाचा हिशेबच वितरक, सेवा केंद्र संचालकांनी दिला नाही. या काळात बाजारातील अनुदानित हरभरा बियाणे गायब झाल्याची प्रचंड ओरड होती. त्यानंतर कृषी विभागाने या प्रकरणात लक्ष देत वाटपाची माहिती घेतली, तसेच चौकशीलाही सुरुवात केली. त्यामध्ये चार कृषी सेवा केंद्राच्या वाटपात अनियमितता आढळली. त्यानुसार, अकोट स्टॅण्ड परिसरातील दीपक कृषी सेवा केंद्र, किसान, जय बजरंग, संजय या केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटिस बजावली. त्यावर गेल्या सोमवारी सुनावणीही झाली. त्यानंतर आज सोमवारी चारही कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केल्याचा आदेश दिला. बियाणे विक्रीवर निर्बंधपरवाने निलंबित केलेल्या चार सेवा केंद्रातून आदेशाच्या दिनांकापासून सहा महिने बियाणे विक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे या केंद्राचा व्यवसाय पूर्णपणे थांबणार आहे. दरम्यान, याप्रकरणी अपिलाची तरतूद असल्याने केंद्र संचालक तेथे धाव घेण्याची शक्यता आहे.पावतीवर नावेही अपूर्णअनुदानित हरभरा बियाणे विक्री करताना केलेल्या अनियमिततेप्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये चार कृषी सेवा केंद्रांनी विक्री पावतीवर शेतकर्‍यांची संपूर्ण नावे लिहिलेली नाहीत. अनेक पावत्यांवर शेतकर्‍यांची स्वाक्षरीच घेतलेली नाही. त्यामुळे त्या शेतकर्‍यांच्या अस्तित्वाबद्दलच शंका निर्माण झाली. बियाणे वितरणाच्या नियमावलीचे पालन केले नाही. विक्रीबाबतचे संपूर्ण अभिलेख ठेवले नाहीत, या कारणासाठी कारवाई करण्यात आली आहे.