शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांची २७ ला प्रसिद्धी

By admin | Updated: February 20, 2017 03:30 IST

भिवंडी- निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर, चंद्रपूर आणि पनवेल या सहा महानगरपालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांची २७ फेब्रुवारीला

मुंबई : भिवंडी- निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर, चंद्रपूर आणि पनवेल या सहा महानगरपालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांची २७ फेब्रुवारीला प्रसिद्धी झाल्यानंतर त्यावर ४ मार्चपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी रविवारी येथे दिली.सहारिया यांनी सांगितले की, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर आणि चंद्रपूर या पाच महानगरपालिकांसह नवनिर्मित पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी मतदार यादीचा कार्यक्र म जाहीर करण्यात आला आहे. ५ जानेवारीला प्रसिद्ध झालेली विधानसभेची मतदार यादी या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या २७ फेब्रुवारीला प्रसिद्ध होतील. तेव्हापासून ४ मार्चपर्यंत या याद्यांवर हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर १० मार्चला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होतील.भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०१७ या अर्हता दिनांकावर आधारित विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी ५ जानेवारीला प्रसिद्ध केली आहे. तीच यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. प्रभागनिहाय यादीत नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे, नावांत अथवा पत्त्यांत दुरुस्त्या करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही; परंतु विधानसभेच्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करताना झालेल्या चुका, प्रभाग बदल अथवा विधानसभेच्या यादीत नाव असतानाही प्रभागाच्या मतदार यादीतून वगळले गेले, अशा स्वरूपाच्या दुरुस्त्या आक्षेप व सूचनांच्या आधारे केल्या जातील, असेही सहारिया म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)