शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

जादा एफएसआयसाठी बनावट कागदपत्रे

By admin | Updated: August 23, 2016 02:01 IST

वडाळा, दादर आणि वरळी येथील एका विकासकाने, एसआरएकडे रहिवाशांचे बनावट कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक केली आहे.

मुंबई: प्रकल्पाला मंजुरी मिळावी, यासाठी वडाळा, दादर आणि वरळी येथील एका विकासकाने, एसआरएकडे रहिवाशांचे बनावट कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक केली आहे. एसआरए अधिकाऱ्यांनीदेखील या कागदपत्रांची पडताळणी न करताच, या प्रकल्पांना मंजुरी दिल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. एखाद्या परिसरात विकासकाला एसआरएअंतर्गत प्रकल्प राबविण्यासाठी जागेवरील ७० टक्के अधिकृत झोपडीधारकांची परवानगी असावी लागते. त्यासाठी झोपडीधारकांचे अधिकृत पुरावे एसआरएमध्ये सादर करून, झोपडपट्टीधारकांची पात्रता सुनिश्चित करण्यात येते. मात्र, वडाळा, लोअर परळ आणि वरळी येथील विकासकाने अनेक बनावट कागदपत्रे एसआरएकडे सादर केली आहेत. यामध्ये बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या विद्युतपुरवठा कार्यालयाचे बनावट पत्र, बनावट विद्युतजोडणीचा अहवाल अशा कागदपत्रांचा समावेश आहे, शिवाय वीजमीटर जोडणीच्या दिनांकामध्ये फेरफार करून झोपडीधारकांची पात्रता सुनिश्चित करण्यात आली आहे. वडाळा येथील कमला रामननगर परिसरातील गणेशसाई गृहनिर्माण संस्था, वरळीतील गांधीनगर येथील परेल लोकसेवा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि तक्षशीला गृहनिर्माण सहकारी संस्था, तसेच दादर नायगांव येथील मातोश्री सदन गृहनिर्माण संस्था या तिन्ही प्रकाल्पांमध्ये एकच विकासक आहे. या विकासकाने झोपडीधारकांची पात्रता सुनिश्चित करण्यासाठी शासन निर्णयांची पूर्णपणे पायमल्ली केली आहे. एसआरएला सादर करण्यात आलेले दस्तावेज व प्रतिज्ञापत्रे यांची सत्यपडताळणी न करता, पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात आले आहेत. त्यामुळे एसआरएमधील संबंधित अधिकाऱ्यांची कार्यालयीन चौकशी करावी व त्यांच्या कालखंडात करण्यात आलेल्या सर्व झोपडीधारकांच्या पात्रतेचीदेखील कसून चौकशी करण्यात यावी. संबंधितांवर लाचलुचपत प्रतिबंधक खाते व लोकायुक्तांकडून संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते संतोष पांडे यांनी केली आहे. अशा पद्धतीने शासनाची फसवणूक करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूलदेखील बुडत आहे. या भ्रष्टाचारात एसआरए अधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांचा मोठा वाटा असल्याने, त्यांचीदेखील लोकायुक्तांमार्फत चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील आरटीआय कार्यकर्ते संतोष पांडे यांनी केली आहे. याबाबत निर्मलनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रारदेखील त्यांनी दिली होती. तथापि, पोलिसांनी यावर अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणी एसआरएतील अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी) >प्रकल्पांना मंजुरीया प्रकल्पांमध्ये विकासकाने बनावट कागदपत्रे सादर करून प्रकल्पांना मंजुरी घेण्यात आली. या प्रकारची बनावट कागदपत्रे सादर करून मिळविण्यात आलेल्या प्रकल्पांमधून जादा एफएसआय मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.