शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट !

By admin | Updated: September 5, 2014 01:06 IST

राज्यभरातील हजारो वन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गत ११ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना आणि महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेच्या नेतृत्वात सुरू

एका संघटनेची माघार : दुसऱ्या संघटनेचा संघर्ष कायम नागपूर : राज्यभरातील हजारो वन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गत ११ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना आणि महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या संयुक्त आंदोलनात गुरुवारी अचानक फूट पडली आहे.यात एकिकडे महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेचे अध्यक्ष विजय मेहर यांनी एका शिष्टमंडळासह सायं. ५ वाजताच्या सुमारास राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) अशोककुमार सक्सेना यांच्याशी चर्चा करून, संप स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. परंतु त्याचवेळी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकून, आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. तसेच उद्या (शुक्रवारी) वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्याशी दुपारी १२ वाजता प्रत्यक्ष भेट घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाईल, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, या दोन्ही संघटनांनी गत २५ आॅगस्टपासून हा राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला होता. यात राज्यभरातील हजारो वन कर्मचारी सहभागी झाले होते. या दोन्ही संघटना वेगवेगळ्या असल्या, तरी त्यांच्या मागण्या मात्र सारख्याच होत्या. त्यामुळे गत ११ दिवसांपासून दोन्ही संघटनांमधील सर्व वन कर्मचारी खांद्याला खांदा लावून, आपल्या हक्कासाठी संघर्ष करीत होते. परंतु गुरुवारी अचानक या दोन्ही संघटनांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी गत ३० आॅगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत वन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच त्यांनी वनरक्षक व वनपाल कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली होती. यानंतर गत नुकत्याच २ सप्टेंबर रोजी वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी पुन्हा वन कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून, वेतनश्रेणी सुधारणेच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.प्रतिकात्मक प्रेतयात्रागत ११ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून गुरुवारी शेकडो वन कर्मचाऱ्यांनी संविधान चौकात शासनाच्या प्रतिकात्मक शव तयार करून, श्रद्धांजली वाहण्यात आली. यात महिला वन कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. दुपारी १२ वाजतापासून सुरू झालेले हे अफलातून आंदोलन सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते. मात्र काहीच वेळात या आंदोलनाची माहिती बर्डी पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यामुळे दुपारी ३ वाजताच्या सुमारास बर्डी पोलिसांनी ते प्रतिकात्मक शव तोडून आकटे ताब्यात घेतले. यानंतर काहीच वेळात पोलीस निरीक्षक येरणेकर सुद्धा आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी वनकर्मचाऱ्यांना लगेच आंदोलनस्थळापासून दूर जाण्याचे निर्देश देऊन, अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. यामुळे घाबरलेल्या आंदोलकांची दाणादाण होऊन, सर्वांनी संविधान चौकातून काढता पाय घेतला.