शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जेलभरोच्या निमित्ताने पक्ष बळकटी

By admin | Updated: September 5, 2015 01:18 IST

राष्ट्रवादी पक्षाने जेलभरो आंदोलनाची घोषणा केली असली तरी त्या निमित्ताने सुस्तावलेल्या आणि काठावर बसलेल्या पक्ष कार्यकर्ते व नेत्यांना बांधून ठेवण्याची योजना आखण्यात आली आहे

अतुल कुलकर्णी, मुंबईराष्ट्रवादी पक्षाने जेलभरो आंदोलनाची घोषणा केली असली तरी त्या निमित्ताने सुस्तावलेल्या आणि काठावर बसलेल्या पक्ष कार्यकर्ते व नेत्यांना बांधून ठेवण्याची योजना आखण्यात आली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी घेतलेल्या बैठकीत या अंगानेही चर्चा झाल्याचे वृत्त आहे.पक्षात मोठे नेते आहेत, नेतृत्व करण्याची क्षमता आहे पण खालच्या पातळीवरचे केडर पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अनेक नेते पक्ष सोडून गेले तर काही नेते अजूनही कुंपणावर बसून आहेत. मोर्चे काढले तर लोकांना गाड्या भरुन आणले जाते आणि त्या त्या नेत्यांच्या क्षमतेनुसार त्या गर्दीची चर्चा होते. पक्षाकडे पाहून लोकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे असे चित्र तयार करण्याची जबाबदारी नव्या फळीने स्वीकारावी ,असे पवार यांनी बजावले. आज पक्षाचे केडरच खाली उरलेले नसल्याने नेत्यांकडे पाहून लोक आंदोलनात उतरतात हे चित्र बदलण्याची गरजही पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच जेलभरो आंदोलनाची कल्पना पुढे आल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपाचे फारसे बळ नव्हते. तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपाने दोन्ही भागात मुसंडी मारली. पश्चिम महाराष्ट्रात धनगर आरक्षणामुळे भाजपाला फायदा झाला. ही गणिते लक्षात घेऊन जेलभरो आंदोलनाच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्याचे काम स्वत: पवार यांनीच हाती घेतले आहे. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात तसेच धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांचे नियोजन करण्याचे काम सूरु आहे. १४ आणि १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या जेलभरो आंदोलनासाठी प्रत्येक नेत्याला एकेका जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या जिल्ह्यात कशा प्रकारे नियोजन करायचे, आंदोलनाचे टोक कसे तीव्र करायचे, कोणत्या मार्गांवर चक्का जाम करायचा, याचे सगळे अधिकार त्या नेत्यांना दिले गेले आहेत. जेलभरो आंदोलनात प्रत्यक्षात कोणकोण अटक करुन घेणार याच्या याद्या तयार करण्याचे कामही सुरु झाले आहे. या सगळ्या जिल्ह्णांमधून किमान १ लाख लोकांनी अटक करुन घ्यावी असे नियोजन केले गेले आहे. ‘शेतकऱ्यांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही’ असे म्हणत अटक करुन घेतली जाईल. लातूर, उस्मानाबा आणि बीड हे दोन जिल्हे यात लक्ष्य केले जाणार आहे.