शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘जय जवान’च्या याचिकेला सेनेचे बळ

By admin | Updated: August 24, 2016 03:22 IST

प्रताप सरनाईक यांनी ‘जय जवान’ गोविंदा पथकाच्या सर्वोच्च न्यायालयातील जनहित याचिकेला पाठबळ देत हंडीवरील निर्बंध कायदेशीर मार्गाने शिथिल करवून घेण्याची धडपड सुरु ठेवली

ठाणे : नऊ थरांची हंडी आणि ११ लाखांचे बक्षिस लावून न्यायालयीन आदेशांना आव्हान देण्याचा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला असतानाच शिवसेना आमदार व दहीहंडीचे आयोजक प्रताप सरनाईक यांनी ‘जय जवान’ गोविंदा पथकाच्या सर्वोच्च न्यायालयातील जनहित याचिकेला पाठबळ देत हंडीवरील निर्बंध कायदेशीर मार्गाने शिथिल करवून घेण्याची धडपड सुरु ठेवली आहे. मनसेने ठाण्यात ठिकठिकाणी नऊ थरांच्या हंडीचे फलक लावले आहेत. मनसेने आपली सर्व कुमक ठाण्यातील दहीहंडी यशस्वी करण्याकरिता उतरवली असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रित केले आहे. त्याचवेळी संस्कृती युवा प्रतिष्ठानचे प्रमुख प्रताप सरनाईक यांनी, बुधवारी जय जवान गोविंदा पथकाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेचा सर्व खर्च करणार असल्याची घोषणा केली. यंदाच्या दहीहंडी उत्सवात कोणत्याही प्रकारची थरांची स्पर्धा करणार नसल्याचे खा. राजन विचारे आणि आ. सरनाईक यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदेत सांगितले. आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे साजऱ्या करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवात चार थरांच्यावर थर लावले जाणार नसल्याचे खा. विचारे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून आमच्या दहीहंडी उत्सवात चार थरांच्यावर थर लावले जात नाहीत. आम्ही जीवघेणी स्पर्धा करीत नाही. हिंदूच्या सणांवरील निर्बंधांना विरोधहिंदुस्थानात हिंदूंचे सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे झाले पाहिजे. राज्य सरकार बाजू मांडण्यात कमी पडले आहे. हिंदूंच्या सणांवर निर्बंध का येतात. एकीकडे या खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला असताना दुसरीकडे या उत्सवावर आणलेले निर्बंध चुकीचे आहेत. गोविंदांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे ही आयोजकांची जबाबदारी आहे, असे खा. विचारे यांनी सांगितले. संस्कृती युवा प्रतिष्ठान यंदा न्यायालयीन नियमांच्या अधीन राहून व राज्य शासनाच्या क्र ीडा खात्याच्या धोरणानुसार दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे, असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. अत्यंत साधेपणाने हा मराठमोळा उत्सव साजरा करून महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा आम्ही कायम चालू ठेवणार आहोत असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>कान्हाचा १० टक्के नफा जखमी गोविंदांना‘कान्हा’ या आपण प्रदर्शीत केलेल्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून जो नफा होईल त्यापैकी १० टक्के रक्कम यापूर्वी दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदांवरील उपचारासाठी देण्यात येणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.