शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दारूच्या कारखान्यावर धाड

By admin | Updated: August 27, 2014 00:59 IST

जरीपटक्यातील एका बनावट दारूच्या कारखान्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज धाड घालून ब्रॅण्डेड कंपनीचा मोठा बनावट दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी अशोक सुंदरदास अडवाणी

मोठा साठा जप्त : गुन्हे शाखेची कारवाई नागपूर : जरीपटक्यातील एका बनावट दारूच्या कारखान्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज धाड घालून ब्रॅण्डेड कंपनीचा मोठा बनावट दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी अशोक सुंदरदास अडवाणी (वय ५१) याला पोलिसांनी अटक केली.नागपुरातील काही भागात बनावट दारूचे कारखाने अनेक वर्षांपासून सुरू आहेत. मध्य प्रदेशात तयार होत असलेली मात्र महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेली दारू नियमित नागपुरात आणली जाते. विशिष्ट रसायन घालून आणि प्रक्रिया करून वेगवेगळी दारू तयार केली जाते. आॅफिसर चॉईस, मॅकडोनाल्ड, रॉयल चॅलेंज तसेच अन्य ब्रॅण्डेड कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये भरून तिची विक्री केली जाते.काही बार आणि वाईन शॉपच्या संचालकांना हाताशी धरून या बनावट दारूची राजरोसपणे विक्री होते. बनावट दारू बनविणारे एकीकडे शासनाचा कोट्यवधींचा कर बुडवितात आणि दुसरीकडे मद्यपींच्या आरोग्याशी खेळून यातून कोट्यवधींची कमाई करतात. पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांना याची माहिती आहे. मात्र, महिन्याला मोठी मलाई मिळत असल्यामुळे त्याकडे हे अधिकारी दुर्लक्ष करतात. जरीपटक्यातील कुंगू कॉलनीतील अशोक अडवाणी हा अशीच बनावट दारू तयार करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून पोलीस आयुक्त के. के.पाठक यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त सुनील कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वात पो.नि. ताथोड, सहायक निरीक्षक नरेंद्र पवार, गोकुळ सूर्यवंशी, पीएसआय वहाब, अजीज, हवालदार इसराईल, नरेंद्र चौधरी, राजेश ठाकूर, प्रकाश, शत्रुघ्न कडू, शिपाई मनजित, दयाशंकर, गीता यांनी आज अडवाणीच्या कारखान्यात धडक दिली. तेथे मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा साठा, विविध रसायने पोलिसांना आढळली. ही बनावट दारू वेगवेगळ्या कंपन्यांचे वेष्टण असलेल्या बाटल्यांमध्ये भरली जात होती. सील करण्याचेही उपकरण पोलिसांना आढळले. जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या आणि साहित्याची किंमत १ लाख ४७ हजार रुपये आहे. (प्रतिनिधी)