शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये झोपडपट्ट्यांत घडताहेत फूटबॉलपटू

By admin | Updated: October 13, 2016 08:41 IST

शाळा सोडलेली, व्यसनाधीन झालेली, हाणामाऱ्या करणारी झोपडपट्ट्यांतील मुले आता चक्क फूटबॉल चॅम्पियन बनू पाहत आहेत. नगर शहरात असे चाळीस फूटबॉल पटू तयार झाले आहेत

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. १३ -  शाळा सोडलेली, व्यसनाधीन झालेली, हाणामाऱ्या करणारी झोपडपट्ट्यांतील मुले आता चक्क फूटबॉल चॅम्पियन बनू पाहत आहेत. नगर शहरात असे चाळीस फूटबॉल पटू तयार झाले आहेत. सध्या हा संघ नागपूरला राज्यस्तरीय स्पर्धा खेळतोय. नगर शहरात बालभवन ही संस्था झोपडपट्ट्यांमध्ये शिक्षणाचे काम करते. दररोज संध्याकाळी झोपडपट्टीत वर्ग भरवून तेथे मुलांचा अभ्यास घेतला जातो. या वर्गांत येणाऱ्या तसेच इतर शाळाबाह्य मुलांनाही शाळांची गोडी लागावी यासाठी बालभवनने फूटबॉल सुरू केला. या मुलांना फूटबॉल खेळायला लावला. त्यातून ही मुले अगोदर संस्थेत व नंतर शाळेत रमू लागली. सध्या दररोज चाळीस मुले पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मैदानावर दररोज सायंकाळी फूटबॉल खेळतात. या मुलांत १२ ते १७ वयोगटांची मुले आहेत. बालभवनने एक नियमही बनविलाय. ‘नो स्कूल, नो फूटबॉल’. म्हणजे मुले शाळेत गेली नाही तर त्यादिवशी मैदानावर त्याला खेळू दिले जात नाही. ‘स्लम सॉकर’ नावाची एक संस्था आहे. ही संस्था झोपडपट्ट्यांतील मुलांसाठी फूटबॉलची स्पर्धा घेते. बालभवनला ही माहिती मिळाल्यानंतर नगरचा संघ आता नागपूर येथील या स्पर्धेत सहभागी झाला आहे. १३ व १४ आॅक्टोबरला ही स्पर्धा होत असल्याचे बालभवनचे संचालक हनिफ तांबोळी यांनी सांगितले. या राज्यस्तरीय स्पर्धेनंतर मुलांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीही निवड होणार आहे.बालभवनच्या टीममधील काही मुलांनी शाळांच्या माध्यमातून विविध स्तरावर चांगली कामगिरी केली. अविनाश घोरपडे नावाचा नववीतील मुलगा विभागीय स्तरावर खेळला आहे.