शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यपदार्थावरून संस्कृती ठरत नाही

By admin | Updated: December 6, 2015 01:08 IST

एखादा खाद्यपदार्थ कोणत्याही समुदायाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असू शकत नाही. तसे झाल्यास भारतात खाद्यपदार्थांवरूनच अनेक संस्कृती निर्माण होतील. संस्कृती यापेक्षा

मुंबई : एखादा खाद्यपदार्थ कोणत्याही समुदायाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असू शकत नाही. तसे झाल्यास भारतात खाद्यपदार्थांवरूनच अनेक संस्कृती निर्माण होतील. संस्कृती यापेक्षा श्रेष्ठ आहे, ‘समूहाच्या खाण्याच्या सवयीवरून त्याची संस्कृती ठरवली जाऊ शकत नाही. असे म्हणत राज्य सरकारने महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारित) कायदा, २०१५चे समर्थन करत या कायद्यामुळे कोणत्याही धर्माच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत नसल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे म्हटले. महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारित) कायदा, २०१५च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवरील अंतिम सुनावणीस शनिवारपासून सुरुवात झाली. या कायद्याद्वारे राज्य सरकारने बैलाची कत्तल करणे, त्याचे मांस बाळगणे, खाणे आणि आयात-निर्यात करण्यास बंदी घातली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. एस.सी. गुप्ते यांच्या खंडपीठापुढे होती. एका याचिकाकर्त्याच्या वतीने ज्येष्ठ वकील अ‍ॅस्पी चिनॉय यांनी कायद्यातील कलम ५(डी), ९(ए)बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. ‘सुधारित कायद्यांतर्गत बैलाचे मांस बाळगणे, खाणे तसेच त्यांची वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अनेक राज्यांत बैलांचे मांस खाण्यास, बाळगण्यास, विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र बैलांचे मांस आयात करण्यास बंदी घालण्यात आलेली नाही. राज्यात काही ठिकाणी बैलांची बैकायदेशीरपणे कत्तल झाली असली तरी राज्य सरकार सर्वांनाच वेठीला धरू शकत नाही. त्या घटनांमुळे सर्वांवर बैलाचे मांस बाळगणे, व्रिकी करणे, खाणे किंवा आयात करण्यास बंदी घातली जाऊ शकत नाही आणि त्यासाठी त्याला कारावासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकत नाही,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. चिनॉय यांनी केला.राज्य सरकारने खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र सादर करत कायद्यातील तरतुदींचे समर्थन केले आहे. ‘समूहाच्या खाण्याच्या सवयीवरून त्याची संस्कृती ठरवली जाऊ शकत नाही. बैलाचे मांस खाणे, ही आपली संस्कृती आहे, असा जर कोणी दावा करत असेल तर संस्कृतीही खाण्याच्या सवयींपेक्षा खूप श्रेष्ठ आहे. एखादा खाद्यपदार्थावरून संस्कृती ठरत असेल तर केवळ खाद्यपदार्थांवरून भारतात अनेक संस्कृती निर्माण होतील. भारतात अनेक पंथाचे लोक राहतात आणि त्यांच्या आहारात भिन्नता आहे,’ असे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय आहे?नागरिकांना त्यांचा आवडता आहार घेण्यापासून राज्य सरकारला त्यांना रोखावे लागत आहे. अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागला, असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी विचारला आहे. घटनेच्या अनुच्छेद २१मध्ये नागरिकांना त्यांच्या आवडता आहार घेण्याचा अधिकार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या या अधिकारावर गदा आली आहे.तसेच अल्पसंख्याकांना त्यांची संस्कृती जपण्यावरही एक प्रकारे बंदी घालण्यात आली आहे. काही धर्मामध्ये बैलांचे मांस खाणे, ही संस्कृती मानली जाते. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अल्पसंख्याकांच्या संस्कृती जोपासण्याच्या अधिकारावर गदा आली आहे, असाही युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला आहे.