शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

उत्सव काळात नियम पाळा वा परिणाम भोगा

By admin | Updated: July 14, 2017 05:57 IST

ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करा, अन्यथा होणाऱ्या परिणामांची जाणीव तुम्हाला आहेच, असा थेट इशारा उच्च न्यायालयाने गुरुवारी सरकार व राजकीय नेत्यांना दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उत्सवांच्या काळात ध्वनिप्रदूषणाचे नियम शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोजकांना दिलेल्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करा, अन्यथा होणाऱ्या परिणामांची जाणीव तुम्हाला आहेच, असा थेट इशारा उच्च न्यायालयाने गुरुवारी सरकार व राजकीय नेत्यांना दिला. दहीहंडी व गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपले असल्याने आयोजकांनी मुख्यमंत्र्यांना व शिवसेना पक्षप्रमुखांना ध्वनिप्रदूषणाचे नियम शिथिल करण्यासाठी साकडे घातले आहे. त्यावर दोन्ही नेत्यांनी नियम शिथिल करण्याचे आश्वासन आयोजकांना दिले आहे. ही बाब ‘आवाज फाउंडेशन’च्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली. तसेच मुख्यमंत्री व राजकीय नेत्यांचे ट्विटही न्यायालयाला दाखवले.‘उच्च न्यायालयाने (दहीहंडी व ध्वनिप्रदूषणाबाबत) दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवले आहे, याची आठवण आम्ही सरकार व राजकीय नेत्यांना करून देत आहोत. त्यामुळे उत्सवांच्या काळात ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळावेच लागतील अन्यथा परिणाम काय होतील, याची जाणीव तुम्हाला आहेच,’ अशा शब्दांत न्यायालयाने सरकार व राजकीय नेत्यांना इशारा दिला.मोठमोठ्याने हॉर्न वाजवल्याने आरोग्यावर होणारे परिणाम व नियमांबाबत टॅक्सी चालकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यास न्यायालयाने सांगितले. ‘निरी’ ध्वनिप्रदूषणाच्या पातळीच्या मोजमापासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. त्याशिवाय बांधकामे करताना ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी राज्य सरकारने आवश्यकता भासल्यास अधिसूचना काढावी, असेही न्यायालयाने म्हटले. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १२ आॅगस्ट रोजी ठेवली आहे.>तक्रारींसाठी व्यवस्था कराउत्सवांच्या काळात सर्रासपणे नियम धाब्यावर बसवत मोठमोठ्याने डीजे वाजवण्यात येतात. याला आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्यातील महापालिकांना तक्रार निवारण कक्ष नेमण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नागरिकांना तक्रारी करता याव्यात यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नंबर, टोल फ्री नंबर, अ‍ॅप इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करा व त्याला प्रसिद्धी द्या, असे निर्देशही न्यायालयाने महापालिकांना दिले.