शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्ट क्रांती मैदानासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा

By admin | Updated: August 2, 2016 05:53 IST

आझाद मैदान आणि आॅगस्ट क्रांती मैदान यांच्या कायापालटासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन राज्यपाल विद्यासागर राव यांनी दिले.

मुंबई : लोकमान्य टिळकांनी जिथे अखेरचा श्वास घेतला ते सरदारगृह, ब्रिटिशांविरुद्धच्या पहिल्या आणि अखेरच्या लढाईचे स्मारक असलेले आझाद मैदान आणि आॅगस्ट क्रांती मैदान यांच्या कायापालटासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन राज्यपाल विद्यासागर राव यांनी दिले. मुंबईतील आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ओआरएफ) या विचारमंचाने यासंदर्भात तयार केलेल्या अहवालाचे प्रकाशन सोमवारी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. लोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून राजभवन येथे आयोजित केलेल्या या छोटेखानी समारंभात राज्यपाल बोलत होते.स्वातंत्र्यलढ्याच्या मुंबईतील स्मृतिस्थळांची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. आॅगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग साचले आहेत. १८५७च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य समरात दोन स्वातंत्र्यवीरांना जिथे जाहीररीत्या तोफेच्या तोंडी देण्यात आले, त्या आझाद मैदानाचीही अवस्था दयनीय आहे. या ऐतिहासिकस्थळांचा पद्धतशीर कायापालट करण्यात यावा, यासाठी ओआरएफने कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. त्यासंदर्भातील ‘इंडिया अ‍ॅट ७० - रिव्हायव्हल आॅफ इंडियाझ फ्रिडम मूव्हमेंट हेरिटेज’ हा अहवाल या वेळी राज्यपालांना सादर करण्यात आला. ओआरएफ मुंबईचे ज्येष्ठ संशोधक गौतम कीर्तने यांनी वास्तुरचनाशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून याची रूपरेषा मांडली आहे. पुढच्याच वर्षी भारतीय स्वातंत्र्य सत्तरीचे होत आहे, त्याआधीच स्वातंत्र्यलढ्यांच्या या स्मारकांचे जतन व्हावे, अशी अपेक्षा या वेळी कीर्तने यांनी व्यक्त केली.सरदारगृह, आझाद मैदान यांसारख्या स्थळांकडे सरकार आणि समाजाचे दुर्लक्ष हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे, असे या वेळी ओआरएफ मुंबईचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी म्हणाले. (प्रतिनिधी)>पालिकेचे राजकारण करण्याचा प्रयत्न हाणून पाडलाआझाद मैदान, आॅगस्ट क्रांती मैदान आणि सरदारगृह ही ऐतिहासिक स्थळे ज्यांच्या मतदारसंघात मोडतात, त्या भाजपाच्या आमदार राज पुरोहित यांनी या प्रसंगीही महापालिका निवडणुकांचे राजकारण तापविण्याचा प्रयत्न केला. या ऐतिहासिक स्थळांचे जतन करण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेचीच असून ते ती नीट पार पाडत नसल्याचा आरोप त्यांनी राज्यपालांसमोर केला.पालिकेतील प्रमुख सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला शह देण्याचा हा प्रयत्न होता. परंतु, ही राष्ट्रीय स्मारके असून त्यांचे जतन करणे ही केंद्र आणि राज्य शासनाची जबाबदारी आहे, असे ठणकावित राज्यपालांनी हा प्रयत्न हाणून पाडला.