शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीचा धर्म पाळा, अन्यथा स्वबळावर

By admin | Updated: January 19, 2017 00:22 IST

विधानसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम संघटना यांनी भाजपाशी युती केली

नाशिक : विधानसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम संघटना यांनी भाजपाशी युती केली होती. निवडणुकीनंतर शिवसेनाही महायुतीत सामील झाली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र दोन्ही पक्ष युतीवरून अडले आहेत. आमच्यासारख्या छोट्या घटकपक्षांना सोबत न घेतल्यास आम्ही तीनही घटक पक्ष एकत्र येऊन महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका लढण्यास तयार आहोत, असा इशारा खासदार राजू शेट्टी व आमदार विनायक मेटे यांनी शिवसेना-भाजपाला दिला. नाशिक येथे स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या मेळाव्यासाठी खासदार शेट्टी आले होते. तर शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी आमदार मेटे आले होते. दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये थांबले होते. त्या वेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्ष, शिवसंग्राम संघटन तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत माहिती दिली. मेटे यांनी सांगितले की, महायुती समन्वय समितीची तातडीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेण्याची मागणी आम्ही तीनही पक्षांनी केली आहे. सद्यस्थितीत शिवसेना व भाजपात युती होईल, असे वाटत नाही. त्यामुळे आम्ही तीनही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यास तयार आहोत. आम्हाला सोबत घेतले तर महायुतीतून आम्ही निवडणुका लढू, सोबत घेतले नाही तर आम्ही स्वबळावर लढू, असे आमदार मेटे यांनी सांगितले. खासदार शेट्टी म्हणाले की, महायुतीच्या घटकपक्षांबाबत आगामी निवडणुकांसंदर्भात समन्वय समितीने बैठक घेऊन चर्चा करणे गरजेचे होते. अद्याप त्याबाबत समन्वय समितीची बैठक झाली नाही. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्ष एकमेकांना मदत करणार आहेत; मात्र, महायुती झाली नाही, तर प्रत्येक पक्षाला स्वत:चा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. शिवसेना व भाजपाया दोन मोठ्या पक्षातच अद्याप युती होत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये महायुती अस्तित्वात येऊ शकेल असे वाटत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये स्वाभिमानी पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार आहे. (प्रतिनिधी)>राजने ताळतंत्र सोडलेशिवस्मारकाबाबत राज ठाकरे केवळ प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्यांनी ताळतंत्र केव्हाच सोडले आहे. त्यांना खरोखर माहिती हवी असल्यास ती आपणाकडून घ्यावी. आपण त्यांना हवी ती माहिती देऊ, असे आमदार विनायक मेटे यांनी सांगितले.