शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

फॉरवर्डिंगपेक्षा नवनिर्मितीवर भर द्यावा

By admin | Updated: December 31, 2016 03:05 IST

फेसबुक, ट्विटर आदी सोशल साईटस्वर वावरणाऱ्या स्वयंसेवकांनी आलेले मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा नवी माहिती, नवा विचार मांडण्यावर भर द्यायला हवा. योग्य शब्दांत

मुंबई : फेसबुक, ट्विटर आदी सोशल साईटस्वर वावरणाऱ्या स्वयंसेवकांनी आलेले मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा नवी माहिती, नवा विचार मांडण्यावर भर द्यायला हवा. योग्य शब्दांत आणि भाषेत आपले विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी केले. मुंबईतील संघ कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी सहप्रचार प्रमुख नंदकुमार, कोकण प्रांत प्रचार प्रमुख प्रमोद बापट उपस्थित होते. संघाचे अनेक स्वयंसेवक स्वयंप्रेरणेने सोशल मीडियात कार्यरत आहेत. याशिवाय चार वर्षांपासून सोशल मीडिया सेलद्वारेही संघाची माहिती आणि भूमिका मांडण्याचे काम केले जाते. मात्र आपली भूमिका मांडताना कायम सयंत भाषेचा वापर करावा. असभ्य भाषेचा वापर करू नये. केवळ माहिती फॉरवर्ड करत राहण्यापेक्षा स्वत:चे विचार मांडण्यावर भर द्यावा, अशी संघाची भूमिका असते. याच भूमिकेवर संघाच्या सोशल मीडिया सेलचे काम चालते, असे मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केले. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी शिवराळ भाषेचा वापर होतो, हा आरोप वैद्य यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. ज्यांचा अभ्यास नाही मात्र हिंदुत्वाबाबत आस्था आहे अशी मंडळी प्रतिवादासाठी शिवराळ भाषेचा वापर करतात. स्वयंसेवकांकडून असे प्रकार घडत नाहीत, असा दावाही मनमोहन वैद्य यांनी केला. जे कधी शाखेवरही गेले नाहीत ते स्वयंसेवक कसे असू शकतील, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. संघाचे विचार आणि संघाबाबतची माहिती प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजधानी दिल्लीत सोशल मीडिया सेल कार्यरत आहे. त्याशिवाय प्रत्येक प्रांतात, विभागात आणि काही ठिकाणी जिल्हास्तरावरही स्वयंसेवक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार मांडत असतात. विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथील सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण, माजी सरसंघचालकांचे विविध विषयांवरील भाष्य आणि चिंतन सोशल मीडियाच्या मांडण्यावर आमचा भर असतो. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अलीकडे मुख्य प्रवाहातील माध्यमांनी सरसंघचालकांचे विजयादशमीचे भाषण थेट प्रसारित करण्यास सुरुवात केली असल्याचा दावा सहप्रचार प्रमुख नंदकुमार यांनी केला. (प्रतिनिधी)नोटाबंदीचा आमच्यावर काही परिणाम नाहीकेंद्र सरकारने पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा संघावर काही परिणाम झाला नाही. संघाकडे गुरुदक्षिणेच्या माध्यमातून येणारा निधी लागलीच बँकेत जमा केला जातो. काही महिन्यांपूर्वीच संघाने स्वयंसेवकांसाठी सुमारे ६ लाख ५० हजार फुल पँट वितरित केल्या. ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर ही विक्री करण्यात आली. तेव्हाही चेकद्वारे पैसे घेण्याची सूचना भांडार विभागाला देण्यात आली होती, असे मनमोहन वैद्य यांनी सांगितले.