शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनासाठी ग्रामपातळीवरील कृती आराखड्यांवर भर

By admin | Updated: May 15, 2014 01:37 IST

महाड तालुक्यातील कर्मचार्‍यांसमवेत ग्रामपातळीवर समित्या स्थापन कराव्यात आणि त्याचा कृती आराखडा २३ मेपूर्वी सादर करावा - तहसीलदार कदम

महाड : महाड तालुक्यातील गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता ग्रामसेवक व तलाठी यांनी पंचायत स्तरावरील विविध खात्यांच्या कर्मचार्‍यांसमवेत ग्रामपातळीवर समित्या स्थापन कराव्यात आणि त्याचा कृती आराखडा २३ मेपूर्वी सादर करावा, असे आदेश महाडचे तहसीलदार कदम यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत उपस्थित शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना दिला. आगामी पावसाळा लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार महाड तालुका आपत्ती व्यवस्थापनाची बैठक मंगळवारी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या समवेत नायब तहसिलदार बेलदार, गटविकास अधिकारी म्हात्रे व ग्रामविस्तार अधिकारी एम.डी.सातव आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीमध्ये महाड तालुक्यातील गेल्या काही वर्षात झालेल्या घटनांचा आढावा घेऊन ग्रामसेवक व तलाठ्यांनी आपल्या नेमून दिलेल्या गावाच्या ठिकाणी राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. आरोग्य खात्याचे महत्व लक्षात घेऊन या खात्यांनी आपली यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश तहसिलदार कदम यांनी दिले. १ जून ते आॅक्टोबर अखेरपर्यंत वरिष्ठ अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही कर्मचारी अथवा अधिकार्‍यांनी सुट्टीवर जावू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सुचित केले. सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी डी.के.मोरे यांनी ग्रामसेवक व तलाठी यांची संख्या लक्षात घेता ग्रामपातळीवर विविध खात्यांच्या कर्मचार्‍यांना एकत्र करून समित्या स्थापन करण्याची सूचना करण्याची सूचना केली.