शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

चिमुकल्यांसाठी ‘फोक टू फार्म’ अनोखा उपक्रम

By admin | Updated: July 31, 2016 01:44 IST

विद्यार्थ्यांना शेती व्यवसाय आणि त्यात राबणाऱ्या शेतकऱ्यांबाबत अधिक माहिती व्हावी यासाठी ‘फोक टू फार्म’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले

मुंबई : विद्यार्थ्यांना शेती व्यवसाय आणि त्यात राबणाऱ्या शेतकऱ्यांबाबत अधिक माहिती व्हावी यासाठी मुलुंडच्या सौ. लक्ष्मीबाई इंग्लिश मिडीयम स्कूलने ‘फोक टू फार्म’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना शेती व्यवसायाबाबत अधिक माहिती व्हावी यासाठी शाळेने हा अभिनव उपक्रम राबविला. या वेळी विद्यार्थ्यांना शेतात घेतली जाणारी विविध पिके कोणती?, शेतीमध्ये शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करतो? अशा शेती व्यवसायाविषयीचे अनेक धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांच्या वतीने कृषिभूषण पुरस्कार विजेते श्रीराम गाढवे, नीलेश काळे, विशाल लांडगे यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले. या वेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या खडतर जीवनाचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहण्याचा सल्ला गाढवे यांनी दिला. या उपक्रमांतर्गत शेतात पिकणारी ताजी भाजी थेट विद्यार्थी आणि पालकवर्गाला स्वस्त दरात देण्यात आली. त्यामुळे येथे आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतही झाली. शाळेची पालक - शिक्षक संघटना आणि शॉप फॉर चेंज या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘शहरी विद्यार्थ्यांची फोक टू फार्म या उपक्रमांतर्गत ग्रामीण जीवनाशी नाळ जोडली जावी’ या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांनी दिली. (प्रतिनिधी)