शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीत एफएसआय घोटाळा?

By admin | Updated: August 29, 2016 05:59 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांना कमी दराने एफएसआय वाटप केल्याने नुकसान झाल्याची माहिती शासनाने न्यायालयाला दिली आहे.

नामदेव मोरे,  नवी मुंबईमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांना कमी दराने एफएसआय वाटप केल्याने नुकसान झाल्याची माहिती शासनाने न्यायालयाला दिली आहे. या गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करणार का, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. यामुळे एपीएमसीच्या माजी संचालकांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाने मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांना शिल्लक एफएसआय देण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेतला होता. वास्तविक हा निर्णय घेताना व्यापाऱ्यांकडून किमान रेडिरेकनरप्रमाणे शुल्क आकारणे आवश्यक होते. परंतु प्रत्यक्षात रेडिरेकनरपेक्षा जवळपास ५० टक्के कमी दराने एफएसआय देण्याचा निर्णय घेतला. ६०० रुपये प्रति चौरस मीटर एवढे कमी शुल्क आकारण्यात आले होते. यामुळे या प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याची तक्रार एक संचालक प्रभू पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. परंतु त्यावर काहीही कारवाई न केल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यानंतर पणन संचालकपदी नियुक्ती झालेल्या सुभाष माने यांनी एपीएमसीमध्ये एफएसआय घोटाळा झाला असल्याचा ठपका ठेवून संचालक मंडळ बरखास्त केले होते व संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु हा निर्णय शासनाने रद्द केला होता. एफएसआयचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. २३ आॅगस्टला यावर सुनावणी झाली आहे. शासनाने कमी दराने व्यापाऱ्यांना एफएसआय दिला असल्याचे मान्य केले आहे. यामुळे न्यायालयाने झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करून घेणार का, अशी विचारणा केली आहे. यामध्ये एपीएमसीचे नुकसान झाले असल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करणार का, अशी विचारणा केली आहे. याविषयी शासनाला २९ सप्टेंबरपर्यंत म्हणणे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर शासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. व्यापाऱ्यांकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जाणार की संचालक मंडळांवर गुन्हे दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे बाजार समितीमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यात युतीचे शासन असल्यामुळे कदाचित गुन्हे दाखल केले जातील, असेही बोलले जात आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्याविषयी कोणीही अधिकृत प्रतिक्रिया देत नसले तरी मार्केटमध्ये कामगारांपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये याच विषयाची चर्चा सुरू आहे.