शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये चक्का जाम; बाजारपेठेत खरेदीला उधाण

By admin | Updated: September 5, 2016 02:32 IST

तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेल शहरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

पनवेल : तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेल शहरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. खरेदीसाठी जमलेल्या ग्राहकांमुळे पनवेलमधील सर्वच रस्ते चक्का जाम झालेले पाहावयास मिळाले. बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी विविध प्रकारच्या खरेदीसाठी ही गर्दी ओसंडली होती.भाजी मार्केट, सराफ बाजार, बस स्थानक यासह पनवेल रेल्वे स्थानकावर देखील प्रवाशांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. विशेष म्हणजे बस डेपो, रेल्वे स्थानकावर देखील कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांनी एकच गर्दी केलेली पाहावयास मिळाली. मुंबई - गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था पाहता अनेकांनी रेल्वे मार्गे कोकणात जाण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. यामुळेच कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पहावयास मिळाली. रेल्वे स्थानकावर झालेली गर्दी पाहता रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची चढाओढ पाहावयास मिळाली. पनवेल शहर व परिसरात यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहावयास मिळाला. शहरामध्ये झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करताना वाहतूक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडालेली यावेळी पाहावयास मिळाली. (प्रतिनिधी)गणेशोत्सवानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण असून गणेश मंडळांकडून करण्यात आलेली रोषणाई, आकर्षक देखाव्यांमुळे वातावरणात प्रसन्नता जाणवत आहे. शहरात रविवारी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी डेकोरेशन, पूजेचे साहित्य, नवीन कपडे आदींच्या खरेदीसाठी गणेशभक्तांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने, धान्याची दुकाने यासह रस्त्यावर मिळणारे गणेशचतुर्थीचे साहित्य खरेदीसाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी होती.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मंडप उभारणीचे संपूर्ण काम रविवारी पूर्णत्वास नेले आहे. घरात दीड दिवसाचा गणपती असणाऱ्यांनी रविवारी रात्रीच मूर्तीशाळांमधून श्रीमूर्ती घरी नेली. पहाटे विधिवत पूजनाने गणेशाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच मंगळवारी सायंकाळी या दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे. गणेशचतुर्थीनिमित्त रविवारी मिठाईच्या दुकानांमध्ये गोडधोड खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे पुढील अकरा दिवस उत्साहाचे व धार्मिक वातावरण असणार आहे. चिक्कमोत्याची माळ, गणपती राया, आधी वंदू तुज मोरया, अशी गणेशगीते गणेशोत्सवात घरोघरी ऐकू येणार आहेत.आपल्या लाडक्या ‘बाप्पा’चे सोमवारी आगमन होणार आहे. डोक्याला ‘गणपती बाप्पा मोरया’ अशी अक्षरे लिहिलेली कापडी पट्टी बांधून व टोपी घालून बालचमूंसह आबालवृद्धांपर्यंत सर्वच जण ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत आपल्या बाप्पाला घरी नेणार आहेत. पनवेल शहरात रविवारी संपूर्ण दिवसभर वाहनांच्या रस्त्यांवर लांब रांगा लागल्या होत्या; त्यामुळे बाजार परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत होती. बाजारात चतुर्थीच्या पूजेचे, सजावटीचे, नैवेद्याचे साहित्य, गणपतीला घातली जाणारी विविध आभूषणे, माळा, हार आदी खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस देखील तैनात करण्यात आले होते. वाहतूक नियंत्रण करताना मात्र पोलिसांची मोठी दमछाक होताना दिसत होती.