नागोठणे : येथील पाच रुग्णांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा आजार उद्भवू नये यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन नागोठणे ग्रामपंचायत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे. गणेशोत्सव चालू होण्याच्या दरम्यान काहींना ताप आल्याने ते उपचारासाठी रु ग्णालयात गेले होते. ताप उतरत नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी रक्ताची तपासणी केली असता, हा ताप डेंग्यूसदृश असल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचेडॉ. नितिन नेटके यांच्याकडे विचारणा केली असता, पाच ही रु ग्णांना डेंग्यूचा ताप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे चारही रु ग्ण नागोठण्यातीलच असले, तरी कामधंद्यानिमित्त त्यांना कायम मुंबईकडे जावे लागत असल्याने त्यांना तेथेच या आजाराची लागण झाली असावी असे ते म्हणाले. प्राथमिक केंद्रांतर्गत एकूण पाच रुग्णांना या आजाराने ग्रासले असले, तरी यातील दोन रुग्णांवर केलेल्या उपचारानंतर ते बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दोघांवर नवी मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत तर पाचवा रु ग्ण लक्ष्मीनगर येथील असून त्याच्यावर सध्या रोहे येथील ग्रामीण रु ग्णालयात उपचार चालू आहेत असे डॉ. नेटके यांनी सांगितले.प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून धूर फवारणीसाठी जिल्हा आरोग्य खात्याकडून उपलब्ध झालेला औषधाचा साठा नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयाकडे देण्यात आला असून सध्या त्यांच्याकडून शहरात धूर फवारणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पर्यवेक्षक के.के. कनोजे यांच्या नेतृत्वाखाली डी. जे. वारगुडे, ए. डी. कोल्हे, वाय. के. वारगुडे आदीं आरोग्य पथकाकडून सध्या नागोठणे शहरात तपासणी मोहीम राबवित आहेत. संशियत रुग्णांच्या घरांसह परिसरातील घरांची संपूर्ण तपासणी केली असून आतापर्यंत तपासणी केलेल्या १०० घरांमध्ये कोठेही डेंग्यूच्या आळ्या आढळून आलेल्या नाहीत. मात्र, एका रुग्णाच्या घरात मलेरियाचे डास आढळून आले होते, असे डॉ. नेटके यांनी सांगितले. (वार्ताहर)>डेंग्यूची लक्षणेतीव्र ताप, अंगदुखी, डोळ्याच्या खोबणीत दुखणे, अंगावर पुरळ. भूक मंदावणे, नाकातील रक्तस्त्राव, रक्ताची उलटी, रक्तिबंबिकांचे रक्तातील प्रमाण कमी होणे आदी डेंग्यू आजाराची प्रामुख्याने लक्षणे असून ताप आल्यानंतर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. घरातील भांडी रोजच्या रोज स्वच्छ धुवून भरावीत, फ्रीज, फ्लॉवर प्लॉट, पाण्याच्या टाक्या, कुंड्या, पत्र्याचे डबे आदीत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन नागोठणे ग्रामपंचायत तसेच आरोग्य खात्याकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
नागोठणेत आढळले डेंग्यूचे पाच रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 02:30 IST