शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

पाच महिन्यांत भाज्यांचे भाव पाचपट

By admin | Updated: June 4, 2016 03:38 IST

दुष्काळामुळे भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. राज्यभरातील सर्वच बाजारपेठांमध्ये आवक घटल्याने दर गगनाला भिडले आहेत. भेंडी, टोमॅटोचे दर पाच महिन्यांत पाच पट वाढले आहेत

नामदेव मोरे,  नवी मुंबई दुष्काळामुळे भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. राज्यभरातील सर्वच बाजारपेठांमध्ये आवक घटल्याने दर गगनाला भिडले आहेत. भेंडी, टोमॅटोचे दर पाच महिन्यांत पाच पट वाढले आहेत. किरकोळ बाजारात दोडका, घेवडा व इतर काही भाज्याही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. राज्यात पडलेल्या दुष्काळाचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. पाणीच नसल्याने अनेकांनी भाजीपाल्याचे उत्पादनच घेतले नाही. परिणामी, राज्यभर भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये रोज ६०० ते ७०० वाहनांची आवक होते. परंतु सद्य:स्थितीत ४०० ते ४५० वाहनांचीच आवक होत आहे. त्यातही लहान वाहनांचा समावेश जास्त आहे. राज्यातून आवक घटल्याने गुजरात व कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. सद्य:स्थितीमध्ये मुंबईमध्ये ४० ते ५० ट्रक माल परराज्यातून येत आहे. पुढील दोन महिने बाजारभाव असेच राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतील दर जून भेंडी७५ ते ८०दुधी भोपळा६० ते ७०फरसबी८० ते १००फ्लॉवर६० ते ८०गवार६० ते ८०घेवडा१६० ते १८०कारली६० ते ८०कोबी४० ते ५०दोडका१०० ते १२०