शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पाच महिन्यांत ४७२ लाचखोर जाळ्यात

By admin | Updated: June 7, 2016 20:43 IST

आप्पासाहेब पाटील राज्यात लाचखोरीत अव्वल राहण्याची परंपरा महसूल व पोलीस खात्यानी कायम ठेवली आहे़ १ जानेवारी ते ३ जून या पाच महिन्याच्या कालावधीत राज्यात ४७२ लाचखोर जाळ्यात अडकले आहेत़

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई :पोलीस आणि महसूल खाते आघाडीवरचसोलापूर : आप्पासाहेब पाटील राज्यात लाचखोरीत अव्वल राहण्याची परंपरा महसूल व पोलीस खात्यानी कायम ठेवली आहे़ १ जानेवारी ते ३ जून या पाच महिन्याच्या कालावधीत राज्यात ४७२ लाचखोर जाळ्यात अडकले आहेत़ उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती कमविणारे आणि इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील सरकारी कर्मचाऱ्याचाही यात समावेश आहे़ लाचखोरांमुळे सर्वसामांन्याची होणारी पिळवणूक तसेच शासकीय-निमशासकीय कामासाठी सामांन्याची पदोपदी होणारी अडवणूक वाढत असल्याने स्वत:च्या फायद्यासाठी सरकारी बाबुंना लाच देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अशा लाचखोरांविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गत पाच महिन्यामध्ये केलेल्या सापळा कारवाईत ४६३ लाचखोरांना पकडले आहे. त्याचप्रमाणे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती कमविणारे व इतर भ्रष्टाचार प्रकरणातील ८ अशा एकूण ४७२ लाचखोरांना अटक करुन त्यांच्याकडून सुमारे १० कोटी ९० लाख ६ हजार २५३ रूपये एवढी मालमत्ता हस्तगत करण्याची कारवाई केली आहे.विभागनिहाय लाचखोरांची संख्यामुंबई : ३७ठाणे : ५५पुणे : ८३नाशिक : ६०नागपूर : ६१अमरावती : ५१औरंगाबाद : ७८नांदेड : ४७एकूण : ४७२़वर्षनिहाय लाचखोरांची संख्या२०१० : ५२८२०११ : ५१२२०१२ : ५१४२०१३ : ६०४२०१४ : १३१६२०१५ : १२७९२०१६ जूनअखेर : ४७२लाचखोर खातेनिहायमहसुल १४५, पोलीस १३८, म़रा़वि़मं २३, महानगरपालिका २७, पंचायत समिती ५९, वनविभाग २२, आरोग्य विभाग २०, शिक्षण विभाग ३६, आरटीओ ८, पाणीपुरवठा ६, बांधकाम विभाग ५, विधी व न्यायविभाग ७, समाजकल्याण विभाग ८, कृषी विभाग ७ व अन्य़२०१६ मधील ३८१ प्रकरणे प्रलंबितसन २०१६ या सालात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विविध शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचखोरीत पकडलेल्या ४७४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ यातील ३८१ प्रकरणे प्रलंबित आहेत़ यातील १८ प्रकरणाचे दोषारोप दाखल करण्यात आले आहेत़ बदनामीनंतरही लाचखोरीत वाढलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदनामी व्हावी व त्यातून असे प्रकार थांबावेत या उद्देशाने सोशल मिडियाचा आधार घेतला़ लाचखोरीत सापडलेल्यांचे फेसबुकवर छायाचित्र प्रसिध्द करून त्याची बदनामी करण्याच्या हेतू लाचलुचपत विभागाचा होता़ मात्र बदनामीनंतरही लाचखोरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालल्याची माहिती समोर आली आहे़ त्यामुळे सोशल मिडियावर बदनामी करण्याचा फंडा फेल जातो की काय अशी आशा निर्माण झाली आहे़ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मानसिकतेमुळे लाचखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ सर्वसामान्यकडून लाच स्वीकारणाऱ्या बाबुंच्या बदनामीसाठी सोशल मिडियाचा आधार घेतला आहे़ शिवाय तक्रारदारांसाठी विविध सेवासुविधा निर्माण करून दिल्यामुळे तक्रारदारांची संख्या वाढली आहे़ लाचखोरांवर जास्तीत जास्त कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कटिबध्द आहे़-गणेश जवादवाडउप अधिक्षक, सोलापूर एसीबी़