शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पार्टी ड्रग्ज विकणाऱ्या पाच हायप्रोफाइल मित्रांना अटक

By admin | Updated: March 30, 2017 04:19 IST

पार्टी ड्रग्ज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलएसडी डॉट्सची विक्री करणाऱ्या पाच हायप्रोफाइल मित्रांना गुन्हे शाखेने ताब्यात

मुंबई : पार्टी ड्रग्ज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलएसडी डॉट्सची विक्री करणाऱ्या पाच हायप्रोफाइल मित्रांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. यात एका वाहिनीच्या सह निर्मात्याचा समावेश आहे. आरोपींकडून तब्बल ७० लाख किमतीचे एलएसडी जप्त केले आहेत. कांदिवलीच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली. कांदिवली येथील इनॉर्बिट मॉल परिसरात एक टोळी ड्रग्जच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अमलीपदार्थविरोधी पथकाने सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत ७० लाख किमतीचे तब्बल १४०० एलएसडी डॉट्स सापडले. या प्रकरणी अटक करण्यात आलेला अरबाज ताज मोहम्मद खान (२०) हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. अंधेरी लोखंडवाला येथे राहणारा अरबाज बीएमएसचे शिक्षण घेत असून, त्याचे वडील व्यावसायिक आहेत. याच गुन्ह्यात त्याचा अंधेरीत राहणारा चुलत भाऊ फरहान अली खान (२६) यालाही अटक करण्यात आली आहे. त्याचा रियल इस्टेट आणि कार विक्रीचा व्यवसाय आहे. तर या दोघांसोबत एका प्रसिद्ध वाहिनीचा सह निर्माता असलेल्या चारकोपच्या अदम्य समीर मोदीलाही (२२) अटक करण्यात आली आहे. चौथा आरोपी लक्ष्मण उर्फ निखिल राजन (२४) हा हार्डवेअर इंजिनीअर असून, पाचवा आरोपी चिराग महावीर जैन (२४) हा तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. जैन अंधेरी तर राजन मुलुंडचा रहिवासी आहे. अटक आरोपी शाळकरी मित्र आहेत. गेल्या दोन वर्षांपासून झटपट पैसा कमाविण्यासाठी ते अरबाजसह एलएसडी विक्री करीत असल्याचे पोलीस तपासाअंती उघडकीस आले आहे. न्यायालयाने त्यांना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.अमेरिकेतून तस्करीएका पेपरवर ड्रग्जचे ठरावीक एलएसडी ड्रग्जचा डॉट्स टाकला जातो. साधारण हे पेपर एक ते दोन सेंटीमीटर इतक्या आकाराचे असतात. ते जिभेवर ठेवताच विरघळतात. याच्या नशेत दिवसभर आपण काय करतो, याचे भान संबंधिताला राहत नाही. या ड्रग्जचा वापर पार्टीमध्ये केला जातो. याची नशा करणारा वर्ग हायप्रोफाइल आहे. अमेरिकेतून याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. भारतात एक एलएसडी डॉट्स पाच हजार रुपयांना विकला जातो. वरळीतून तीन लाखांचा एमडी जप्तवरळीतून ३ लाख किमतीच्या १५५ ग्रॅम एमडीसह इजाज सुपारीवाला (४०) याला पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या आहेत. अमलीपदार्थविरोधी पथकाच्या वरळी युनिटने ही कारवाई केली आहे. सुपारीवाला हा डोंगरीतील पठाणवाडी परिसरात राहतो.