शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By admin | Updated: August 12, 2014 03:01 IST

गेल्या वर्षी झालेल्या गारपिटीने डोळ्यांत पाणी आणल्यानंतर या वर्षी तरी वरुणराजाची दमदार हजेरी होईल, या आशेवर मराठवाड्यात शेतकऱ्यांनी कर्जे काढून पेरण्या केल्या़

परभणी/बीड/ नांदेड : गेल्या वर्षी झालेल्या गारपिटीने डोळ्यांत पाणी आणल्यानंतर या वर्षी तरी वरुणराजाची दमदार हजेरी होईल, या आशेवर मराठवाड्यात शेतकऱ्यांनी कर्जे काढून पेरण्या केल्या़ मात्र, पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग अधिक गडद झाले आहेत़ मराठवाड्यात पावसाअभावी येणारी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे़ गेल्या २४ तासांत परभणी, बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर नांदेड जिल्ह्यात एक अशा पाच शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली़ परभणी तालुक्यातील मिरखेल येथे भोजराज भिवाजी कनकुटे (५५) यांनी सोमवारी सकाळी १० वाजता शेतातील झाडाला गळफास घेतला. नापिकी व कर्ज कसे फेडावे या नैराश्येतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचा मुलगा नारायण कनकुटे यांनी पोलिसांना सांगितले. दुसऱ्या घटनेत पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारात कैलास पांडुरंग कुऱ्हे पळसकर (३३) असे याने रविवारी रात्री गळफास घेतला. दुबार, तिबार केलेली पेरणी वाया गेल्याने कर्ज कसे फेडावे? या विवंचनेत सापडलेल्या नांदेड जिल्ह्यातील बरबडा येथील रामदास आलमकर (५५) यांनी सोमवारी विषारी द्रवप्राशन करून आत्महत्या केली. बीड जिल्ह्याच्या शिरूरकासार तालुक्यातील फुलसांगवी येथील लहू सर्जेराव गोरडे (५५) या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़ त्यांच्यावर सोसायटीचे कर्ज होते. तर दुसऱ्या घटनेत धारूर तालुक्याच्या बोडका येथे रामभाऊ साळुंके (५४) यांनी सोमवारी सकाळी शेतात झाडाला गळफास घेतला. त्यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला मात्र रात्री उशिरापर्यंत नोंद नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)