शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून पाच वसाहती हिरव्यागार

By admin | Updated: July 4, 2016 04:26 IST

वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळल्याचे लक्षात घेत परभणी शहरातील एका वृक्षप्रेमीने लोकसहभागातून वृक्ष लागवड व संवर्धनाचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.

राजन मंगरूळकर,

परभणी- वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळल्याचे लक्षात घेत परभणी शहरातील एका वृक्षप्रेमीने लोकसहभागातून वृक्ष लागवड व संवर्धनाचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.कृषी विभागात मंडळ कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कैलास सोनाजी गायकवाड यांनी शहरातील गजानननगर, दत्तनगर, समझोतानगर, श्रीरामनगर, तुळजाभवानीनगर आदी भागांमध्ये नागरिकांच्या सहकार्याने वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला. २००८पासून या भागामध्ये आतापर्यंत १० हजारहून अधिक झाडांची लागवड गायकवाड यांनी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने करंजी, गुलमोहर, अशोका या तीन प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.या वसाहतींमध्ये यापूर्वी बोटावर मोजण्याइतकी झाडे असल्याने वाढत्या तापमानाचा त्रास या भागातील रहिवाशांना सहन करावा लागत होता. ही बाब ओळखून कैलास गायकवाड यांनी नागरिकांना सोबत घेऊन प्रत्येक घरासमोर दोन झाडे लावण्यास सुरुवात केली. या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी झाडे लावलेल्या संबंधित घरमालकांनी घेतली. त्यामुळे या भागातील तापमानात बरीच घट झाली आहे.>१२५ बोधीवृक्ष संवर्धनाचा मानसडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त कैलास गायकवाड, त्यांच्या पत्नी वंदना यांनी परभणी शहरातील मोकळ्या जागा, मंदिर, बुद्धविहार आदी ठिकाणी वर्षभरात १२५ बोधीवृक्ष संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. जनजागृतीबद्दल प्रशासनाचे पुरस्कारकैलास गायकवाड यांनी मंडळ कृषी अधिकारी म्हणून काम करताना विविध ठिकाणी वृक्ष लागवड, संवर्धनाची मोहीम राबविली. याबद्दल नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीची जनजागृती केल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने २००३पासून २०१४पर्यंत विविध विभागांनी त्यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला आहे.पुढील काळातही वृक्ष लागवडीचे उपक्रम हाती घेऊन सातत्य चालूच ठेवणार आहे. वृक्ष लागवडीच्या माझ्या मोहिमेची माहिती अनेकांना कळाल्यावर गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ येथील किसान रोपवाटिकेने २ हजार रोपे मोफत लावण्यासाठी दिली होती. यासह पोखर्णी देवी येथील जगदंबा रोपवाटिकेनेही रोपांची मदत केली.- कैलास गायकवाड, वृक्षप्रेमी