शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत पाच मुलांचे जन्म!

By admin | Updated: June 30, 2017 02:49 IST

ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकात होणाऱ्या प्रसूतीनेही आगळा वेगळा इतिहास रचला असून, गेल्या पाच वर्षांत वेगवेगळ्या फलाटांवर

पंकज रोडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकात होणाऱ्या प्रसूतीनेही आगळा वेगळा इतिहास रचला असून, गेल्या पाच वर्षांत वेगवेगळ्या फलाटांवर प्रतीवर्षी एका बालकाचा जन्म झाला आहे. पाच वर्षांत ठाणे स्टेशन पाच बालकांचे जन्मस्थान ठरले आहे.रेल्वे स्थानकात मूल जन्माला आल्यास त्याला आयुष्यभर रेल्वेचा प्रवास मोफत असतो, ही अफवा असून, अशी कुठलीही सवलत दिली जात नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. फक्त बाळाचा जन्म झाल्यावर त्याला जन्म दाखला मिळावा, यासाठी रेल्वेकडून एक प्रमाणपत्र मिळते, अशी माहिती प्रशासनाने दिली.बदलापूर येथे राहणाऱ्या मीनाक्षी जाधव यांची बुधवारी रात्री ठाण्याच्या फलाट क्रमांक १० वर प्रसूती झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सुदैव्याने त्यावेळी तेथे तैनात रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदार शोभा मोटे आणि प्रवाशांमुळे तिची सुखरुप सुटका झाली. याचदरम्यान, ठाणे रेल्वे स्थानकात किती बाळ जन्माला आले याबाबत विचारणा केल्यावर गेल्या पाच वर्षात पाच बालके जन्माला आल्याचे ठाणे रेल्वे प्रबंधक विभागाने सांगितले. दरवर्षी सरासरी एक बाळ जन्माला येते ही बाब पुढे आली. गर्भवतीला रुग्णालयात घेऊन जाताना वेदना वाढल्यास त्यांची प्रसूती फलाटावर तातडीने करण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी रेल्वे प्रशासनाची तारंबळ उडते. महिला कर्मचारी, क्लार्क, महिला पोलीस यांच्या सहकार्याने जाणकार प्रवासी महिलांच्या मदतीने आतापर्यंतच्या सर्व प्रसूती सुखरुप झाल्या आहेत. यामध्ये फलाट क्रमांक २-३ आणि ४-५ व ६ (दोन) तसेच १० वर प्रसूती झाल्या.पाच वर्षांपूर्वी एका महिलेचे माहेरी भांडण झाल्याने ती सासरी जाताना तिची स्थानकात प्रसूती झाली. आतापर्यंत जन्माला आलेल्या बालकांमध्ये एका मुलीचा आणि चार मुलांचा समावेश आहे.