शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

१२ नोव्हेंबरला उडणार विवाहाचा पहिला बार!

By admin | Updated: November 4, 2016 03:04 IST

पाच महिन्यांत ४२ मुहूर्त असल्याने विवाहोच्छुक वधू-वरांसाठी हा स्वप्नपूर्तीचा काळ ठरणार आहे.

पालघर : येत्या १२ नोव्हेंबरपासून लग्नसराईला प्रारंभ होत असून, पुढील पाच महिन्यांत ४२ मुहूर्त असल्याने विवाहोच्छुक वधू-वरांसाठी हा स्वप्नपूर्तीचा काळ ठरणार आहे. पहिला मुहूर्त अठरा दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठेत दिवाळीपूर्वीच लग्नाच्या खरेदीसाठी धूम सुरू झाली आहे. वधू-वरांच्या कुटुंबीयांप्रमाणे व्यापाऱ्यांचेही लग्नसराईकडे लक्ष लागले आहे. शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह समाप्ती आहे. त्यानंतर लगेचच १२ नोव्हेंबरपासून ‘शुभमंगल सावधान’चे सूर सर्वत्र घुमणार आहेत. सकाळी १०.२७, १०.५४ व सायं. ५-३४ असे तीन मुहूर्त १२ नोव्हेंबरला आहेत. पंचांगामध्ये नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ या पाच महिन्यांच्या कालावधीत ४३ मुहूर्त आहेत. यातही डिसेंबर २०१६ आणि फेब्रुवारी २०१७ या दोन महिन्यांत ते सर्वाधिक आहेत. घरात मंगलकार्य असलेल्या कुटुंबीयांना आता लग्नसराईचे वेध लागले आहेत.।नवदाम्पत्याला सुखी-समाधानी जीवन जगता यावे, यासाठीच मुळात विवाह मुहूर्त काढला जातो. पत्रिकेत त्याबाबत नमूददेखील केले जाते. असे असतानासुद्धा विवाह मुहूर्त टाळण्याची वेगळीच प्रथा आता रूढ होत चालली आहे. ते संस्कारी मनाला पटत नाही पण करणार काय हा काळाचा महिमा.।असे आहेत विवाह मुहूर्तनोव्हेंबर २०१६ - १२, १६, २१, २३, २५, २६डिसेंबर २०१६ - १, ३, ४, ५, ६, ८, १४, १८, १९, २०, २३, २४जानेवारी २०१७ - १७, १८, १९, २०, २३, २४, २९फेब्रुवारी २०१७- १, २, ३, ५, ६, १३, १४, १६, १७, १९, २८मार्च २०१७ - १, ६, १४, १५, १६, १८