शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हंटा व्हायरसचा पहिला बळी

By admin | Updated: October 16, 2016 04:33 IST

दुर्मीळ हंटा व्हायरसची लागण झालेल्या कुलाब्यातील १२ वर्षीय मुलाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. या वर्षातील हा हंटा व्हायरसचा आढळलेला पहिला रुग्ण होता.

मुंबई : दुर्मीळ हंटा व्हायरसची लागण झालेल्या कुलाब्यातील १२ वर्षीय मुलाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. या वर्षातील हा हंटा व्हायरसचा आढळलेला पहिला रुग्ण होता. भाटिया रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू होते. त्यानंतर, त्याच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी त्याला गावी नेले होते, तिथे या मुलाचा सकाळी मृत्यू झाला. २०१५ मध्ये कुर्ल्यातील ३९ वर्षीय पुरुषास हंटा व्हायरसची लागण झाली होती. या वर्षी आतापर्यंत हंटा व्हायरसचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. २९ सप्टेंबरला कुलाबा येथे राहणाऱ्या १२ वर्षीय मुलाला भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या मुलाला ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. या मुलाच्या डेंग्यू, मलेरिया, लेप्टोच्या तपासण्या करण्यात आल्या, पण या तपासण्या निगेटिव्ह आल्या. मुलगा खोकताना रक्त पडू लागले. या मुलाची प्रकृती खालावल्याने, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती भाटिया रुग्णालयाचे श्वसनविकार तज्ज्ञ डॉ.आदित्य अग्रवाल यांनी दिली. लेप्टोची तपासणी निगेटिव्ह आल्यानंतर, त्याची हंटा व्हायरसची तपासणी करण्यात आली. या आधी दोन रुग्णांमध्ये त्यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनात त्यांना हंटा व्हायरसची लागण झाल्याचे निदान झाले होते. या मुलाची प्रकृती अधिकच खालावली होती. हंटा व्हायरसवर उपचार नाहीत, पण यात अवयव निकामी होण्यापासून वाचवणे आवश्यक असते. या मुलाच्या नातेवाईकांनी हंटा व्हायरस असल्याचे निदान होण्याआधीच रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला होता. त्यांना डिस्चार्ज केल्यानंतर हंटा व्हायरस तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या पालकांनी कळवल्याचे डॉ. आदित्य यांनी सांगितले. डॉ. आदित्य यांच्याबरोबर डॉ. विनित सदानी आणि डॉ. समीर शहा या मुलावर उपचार करत होते. (प्रतिनिधी)हंटा व्हायरसची लागण ही उंदरांमुळेच होते. उंदराच्या चाव्यामुळे अथवा उंदराच्या मूत्रातून हा व्हायरस शरीरात प्रवेश करतो. सुदृढ व्यक्तीच्या शरीरात हा व्हायरस गेल्यास त्यालाही त्रास जाणवतो. या आजारावर उपचार उपलब्ध नाहीत. हंटा व्हायरस हा अवयवांवर हल्ला करून अवयव निकामी करतो, त्यामुळे गुंतागुंत वाढते.