शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत पहिल्यांदाच मोफत सायकल पार्किंग

By admin | Updated: July 15, 2016 03:25 IST

वाढत्या वाहनांच्या संख्येने मुंबईत वाहनतळाची समस्या, वाहतूककोंडी आणि प्रदूषण असे तिहेरी संकट आणले आहे़ त्यामुळे ‘सायकल टू वर्क’ला प्रोत्साहन देण्यासाठी

मुंबई : वाढत्या वाहनांच्या संख्येने मुंबईत वाहनतळाची समस्या, वाहतूककोंडी आणि प्रदूषण असे तिहेरी संकट आणले आहे़ त्यामुळे ‘सायकल टू वर्क’ला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत प्रथमच विनामूल्य सायकल पार्किंग उपलब्ध करून देण्याची अभिनव योजना पालिकेने आणली आहे़ पहिल्या प्रयोगात कुलाबा, चर्चगेट, फोर्ट या विभागातील ४७ वाहनतळांवर एकूण ४७० सायकलींच्या पार्किंगची सोय असणार आहे़हुतात्मा चौक, मंत्रालय, छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर, फोर्ट परिसर, चर्चगेट, गेट वे आॅफ इंडिया, नरिमन पॉइंट ही सर्वाधिक वर्दळीची ठिकाणं आहेत़ येथील ४७ वाहनतळांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पे अ‍ॅण्ड पार्कच्या देखभालीकरिता पालिकेने निविदा मागविल्या आहेत़ या ४७ वाहनतळांवर पाच हजार ६५० चारचाकी आणि दोन हजार ५४७ दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय आहे़ निविदेमध्ये तसा समावेश करून ही पार्किंग सायकलस्वारांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ या वाहनतळाच्या माध्यमातून दरमहा एक कोटी १४ लाख ३१ हजार रुपयांचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे़ सरकारी व खाजगी कार्यालयांमुळे अतिवर्दळीचा व उच्चभ्रू ठरलेल्या या विभागामध्ये ४७ वाहनतळ आहेत़ या वाहनतळांमध्ये आठ हजार १९७ वाहनांचे पार्किंग शक्य आहे़ (प्रतिनिधी)