शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अकरावीची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर

By admin | Updated: August 11, 2016 21:59 IST

दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसह ज्या विद्यार्थ्यांना शाखा किंवा विषय बदल करायचा आहे, त्यांच्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष फेरीची पहिली आॅनलाईन गुणवत्ता

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11 -  दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसह ज्या विद्यार्थ्यांना शाखा किंवा विषय बदल करायचा आहे, त्यांच्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष फेरीची पहिली आॅनलाईन गुणवत्ता यादी गुरूवारी रात्री उशीराजाहीर झाली. या यादीत ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळालाअसून उरलेल्या ७ हजार ६६७ विद्यार्थ्यांना दुसºया विशेष फेरीसाठी अर्जकरावा लागणार आहे.विशेष गुणवत्ता यादीत अर्ज केलेल्या ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांपैकी ७हजार ६६७ विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही.याउलट ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलाची संधी मिळाली आहे.मात्र केवळ ४० हजार ३२६ विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीच्यामहाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. याउलट उरलेल्या १९ हजार ६३४विद्यार्थ्यांना पसंतीक्रमातील पहिल्या तीन महाविद्यालयात प्रवेशमिळालेला नाही. त्यामुळे दुसºया विशेष फेरीत सुमारे २५ हजारांहून अधिकविद्यार्थी अर्ज करण्याची शक्यता आहे.दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या विशेष फेरीत प्रवेश मिळाला आहे,त्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन शुक्रवार व शनिवारदरम्यान प्रवेशनिश्चित करायचा आहे. नाही तर हा प्रवेश रद्द होईल. महत्त्वाची बाब म्हणजेविशेष गुणवत्ता यादीतील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनायाआधीच्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करावा लागेल. शिवाय ज्याविद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नाही, त्यांना इतरविद्यार्थ्यांप्रमाणे दुसºया विशेष फेरीसाठी अर्ज करता येईल, अशी माहितीशिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली.दुसºया विशेष प्रवेश फेरीत सामील होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनानव्याने लॉगीन आयडी व पासवर्ड घ्यावा लागणार आहे. शिवाय पुन्हा एकदाप्रवेश अर्ज व पसंतीक्रम अर्ज भरावा लागणार आहे. पहिल्या फेरीत अर्धवटअर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीसाठी नव्याने लॉगीन आयडी  वपासवर्ड घेऊन अर्ज करता येईल. लवकरच दुसºया विशेष प्रवेश फेरीचेवेळापत्रक जाहीर केले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.एकूण प्रवेश अर्ज - ६७ हजार ६२७प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी - ५९ हजार ९६०प्रवेशापासून वंचित विद्यार्थी - ७ हजार ६६७पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी २७ हजार ३८७दुसºया पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी - ७ हजार ९०४तिसºया पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी - ५ हजार ०३५शाखानिहाय प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या -कला ४ हजार ७८२वाणिज्य ३८ हजार ७३२विज्ञान १६ हजार ४४६

यादीला उशीर, विद्यार्थ्यांचा संतापअकरावीच्या पहिल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत दूरचे महाविद्यालयमिळाल्याने अनेक विद्यार्थी नाराज झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचीनाराजी दूर करण्यासाठी प्रशासनाला आॅनलाईनच्या तीन विशेष फेºया घ्याव्यालागत आहेत. मात्र पहिल्याच विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यातप्रशासनाला उशीर झाला. सायंकाळी पाच वाजता जाहीर होणारी गुणवत्ता यादीरात्री नऊ वाजेपर्यंत जाहीर झाली नव्हती. परिणामी विद्यार्थ्यांसहपालकांच्या संतापात भर पडली.