शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

आधी अमित शहांची संपत्ती जाहीर करा

By admin | Updated: February 15, 2017 03:47 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणारे भाजपा खासदार किरीट सोमय्यांविरोधात शिवसेनेने मंगळवारी जोरदार आघाडी

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणारे भाजपा खासदार किरीट सोमय्यांविरोधात शिवसेनेने मंगळवारी जोरदार आघाडी उघडली. सोमय्यांना इतकीच हौस असेल, तर त्यांनी आधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची संपत्ती जाहीर करावी. कसलेही पुरावे न देता, बिनबुडाचे आरोप करण्याचा सोमय्या यांचा धंदा असल्याची टीका शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली. उद्धव ठाकरे यांचे सात कंपन्यांशी आर्थिक लागेबंध असून, त्यांनी आपली संपत्ती जाहीर करावी, असे आवाहन किरीट सोमय्या यांनी केले होते. यावर स्वत:च्या खासदारकीच्या लेटरहेडवर इतरांच्या संपत्ती तपासण्याचा अधिकार सोमय्यांना दिला कोणी, असा सवाल राहुल शेवाळे यांनी केला. राष्ट्रीय शेअर मार्केटमध्ये घोटाळ्याचा दावा करणाऱ्या सोमय्या यांनी २०१६ साली स्वत:च पंतप्रधान कार्यालयाला पत्र देऊन सदर प्रकरण दाबले. या घोटाळ्यातील सोमय्यांच्या संशयास्पद सहभागाची चौकशी व्हावी. आरोपांच्या नावाखाली सोमय्या यांनी ब्लॅकमेलिंगचा धंदा उघडला आहे, असा आरोपही शेवाळे यांनी केला. अनेक ट्रॅव्हल कंपन्या, फार्मसी कंपन्या, शेअर बाजारातील काही कंपन्यांच्या माध्यमातून सोमय्या आर्थिक गैरव्यवहार करतात. शेअर बाजारात दरवर्षी पाच हजार कोटींचा घोटाळा होतो. विविध कंपन्यांच्या माध्यमातून घोटाळा करायचा आणि भाजपाला पैसे पाठवायचे काम सोमय्या करतात. इनाम फायनान्शियलचे इन्व्हेस्टमेंट बँकर वल्लभ भन्साळी यांच्या आणि किरीट सोमय्यांच्या संबंधांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेखर वैष्णव यांनी केली. (प्रतिनिधी)