शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

आधी सरकार, नंतर मुख्यमंत्री ठरवू - दिग्विजय सिंग

By admin | Updated: August 27, 2016 18:13 IST

गोव्यात अगोदर कॉंग्रेसचे सरकार आणू आणि नंतर मुख्यमंत्री कोण ते ठरवू असे प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी दिग्विजयसिंग यांनी सांगितले आहे

- ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 27 - गोव्यात अगोदर कॉंग्रेसचे सरकार आणू आणि नंतर मुख्यमंत्री कोण ते ठरवू असे प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी दिग्विजयसिंग यांनी मुख्यमंत्री पदाच्या दावेदाराविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. आम आदमी पार्टी आणि भाजप यांचा कॉंग्रेसमूक्त भारतासाठी गुप्त करार असल्याचा त्यांनी आरोप केला.
 
निवडणुकीनंतर गोव्यात कॉंग्रेसचे सरकार येणार आहे. भाजप सरकारला जनता विटली असून निवडणुकीतत्याची प्रचिती येणार आहे असे दिग्विजय सिंग यांनी कॉंग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. कॉंग्रेसचा मुख्यमंत्रीपदासाठीचा उमेदवार कोण आहे असे विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री नंतर ठरविला जाईल, कॉंग्रेसचे सरकार आणणे हे पहिले लक्ष्य असेल असे त्यांनी सांगितले. 
 
कॉंग्रेसमुक्त भारत हे भाजप आणि आम आदमी पार्टीचा संयुक्त नारा आहे. या दोन्ही पक्षांचे उद्धीष्ट एक आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी  दिल्लीत विविकानंद फाऊंडेशनमध्ये झालेल्या बैठकीत अरविंद केजरीवाल हे सहभागी होते. त्यांनी या विधानाचा इन्कार करून दाखवावा असे आव्हानही त्यांनी दिले.
 
गोव्यात भाजप हा कॉंग्रेसचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे. गोव्यात आम आदमी पार्टीला स्थान नाही, परंतु हा पक्ष मतविभागणी करून भाजपला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ही त्यांची संयुक्त रणनीतीही आहे असे ते म्हणाले. 
 
कॅसिनोला विरोध नाही पण...
गोव्यात ऑफ शोर कॅसिनोंच्या विरोधात कॉंग्रेस नाही. कॉंग्रेसनेच कॅसिनो गोव्यात आणले होते. परंतु हे कँसिनो मांडवितून हटविले जावेत. किती लांब अंतरावर समुद्रात त्यांना ठेवण्यात यावे हे ही निश्चित केले जावे ही पक्षाची भुमिका असल्याचे त्यांनी सांगितले.  भाजपने तर प्रत्येक मुद्द्यावर यू टर्न घेतल्याचे त्यांनी सांगितले.