शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या तस्करांकडून हिंदू रामसेनेच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार

By admin | Updated: August 22, 2016 18:49 IST

दोन ट्रकमधून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती हिंदू रामसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी ट्रकचा पाठलाग केला

ऑनलाइन लोकमतचंद्रपूर, दि. २२ : दोन ट्रकमधून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती हिंदू रामसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी ट्रकचा पाठलाग केला. दरम्यान येथील बसस्थानकाजवळ तस्करांनी हिंदू रामसेनेच्या कार्यकर्त्यांवर वाहनातून गोळीबार केला. चार फैरी झाडल्यानंतर ते वेगाने पसार झाले. मात्र पडोलीजवळ पोलिसांनी त्यातील एक ट्रकला अडवून एका आरोपीला अटक केली. हा प्रकार काल रविवारी रात्रीच्या सुमारास घडला.

चंद्रपुरात माता महाकालीचे दर्शन घेऊन हिंदू रामसेनेचे अध्यक्ष तथा गृहमंत्रालयाचे हिंदी सल्लागार सदस्य श्रीनिवास संभाशिव ध्यावर्तीवार व त्यांचे मित्र विशाल नगराळे, मधुकर अल्लूरवार, रमेश गादरवार, निखील कल्लारवार आणि अन्य दोघे हे बोलेरो व अन्य एका वाहनाने नागपूरकडे जात होते. दरम्यान जाम येथील एका चहा टपरीवर ते थांबले. तिथे थांबलेल्या दोन ट्रकमधून त्यांना उग्र वास आला. चौकशीनंतर दोन्ही ट्रकमधून जनावरांची तस्करी होत असल्याचे त्यांना समजले. हे ट्रक नागपूरवरून चंद्रपूरकडे जात होते. ध्यावर्तीवार व त्यांच्या सहकार्यांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. सोबतच याची माहिती वरोरा पोलिसांना देण्यात आली. परंतु पोलीस उशिरा पोहचल्याने ट्रक वरोऱ्यापुढे निघून गेले. दरम्यान नंदोरी टोल नाक्यावर ट्रकला अडविण्यात आले. मात्र टोलनाक्याचे बॅरिकेट तोडून ट्रक वेगाने पुढे निघाले.

दरम्यान, भद्रावती पोलिसांनी पेट्रोलपंप चौकात बॅरिकेट लावून ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही ट्रक बॅरिकेट तोडून पुढे गेले. हिंदू रामसेनेचे कार्यकर्ते याही स्थितीत त्यांचा पाठलाग करीत होते. भद्रावतीच्या नवीन बसस्थानकाजवळील उड्डाणपुलावर तस्कराचे वाहन येताच त्यांनी तिथून ध्यावर्तीवार यांच्या वाहनावर गोळीबार सुरू केला. यावेळी त्यांनी चार फेरी झाडल्या. या गोळ्या वाहनाला लागल्या. सुदैवाने प्राणहानी टळली. गोळीबारानंतरही भद्रावती पोलीस आणि रामसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग सुरूच ठेवला. दरम्यान, पडोलीजवळ यातील एका ट्रकला भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेत एका आरोपीला अटक केली. मात्र गोळीबार करणारे चारचाकी वाहन व आणखी एक ट्रक पळून जाण्यात यशस्वी ठरले. जिल्हा पोलीस उपअधीक्षक हेमराजसिंग राजपुत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवर हे फरार आरोपींचा शोध घेत आहेत.पाठलाग करणाऱ्या वाहनाचा अपघातजनावर तस्करांच्या ट्रकचा पाठलाग करीत असताना हिंदू रामसेनेच्या एका वाहनाला अपघात झाला. या अपघातात हिंदू रामसेनेचे काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले.