शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या जिल्हा सरचिटणीसावर गोळीबार

By admin | Updated: February 19, 2017 15:36 IST

महामार्गालगत लघुशंकेसाठी थांबलेले भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार आत्माराम ननावरे यांच्यावर दोन युवकांनी गोळीबार केला.

आॅनलाईन लोकमतसातारा/काशीळ, दि. 19 - महामार्गालगत लघुशंकेसाठी थांबलेले भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार आत्माराम ननावरे (वय ३९, रा. कोळकी, ता. फलटण) यांच्यावर दोन युवकांनी गोळीबार केला. मात्र, यामध्ये ते बालंबाल बचावले. ही थरारक घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बोरगावजवळ घडली.नंदकुमार ननावरे हे शनिवारी दुपारी कारमधून कऱ्हाडला गेले होते. रात्री ते परत फलटणला निघाले होते. बोरगावजवळील उड्डाणपुलाच्या पुढील बाजूस आल्यानंतर त्यांनी लघुशंकेसाठी कार थांबविली. कारच्या पाठीमागील बाजूस उभे असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. मोठा आवाज झाल्याने त्यांनी पाठीमागे वळून पाहिले असता दुचाकीवर दोन युवक होते. त्यातील पाठीमागे बसलेल्या युवकाच्या हातात पिस्तूल होते. काही क्षणातच दोघेही हल्लेखोर तेथून पसार झाले. ननावरे ययांच्या कारमधील सीटवर गोळी लागल्याचा खुणा आहेत. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या ननावरे यांनी तत्काळ बोरगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. परंतु हल्लेखोर सापडले नाहीत.गोळीबार झाल्याचे समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासाच्या अनुषंगाने त्यांनी बोरगाव पोलिसांना सूचना केल्या. पोलिसांना घटनास्थळी पिस्तूलमधील पुंगळी सापडली आहे. ही पुंगळी चाचणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याचे बोरगाव पोलिसांनी सांगितले. संबंधित दोन अनोळखी युवकावर ३०७ (खुनाचा प्रयत्न)चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)काळ्या रंगाचे शर्ट !हल्लेखोरांनी काळ्या रंगाचे शर्ट परिधान केले होते. दोघांनीही तोंडाला काहीही बांधले नव्हते. मात्र, इतर वाहनांच्या प्रकाशझोतामुळे ननावरे यांना त्यांचा चेहरा स्पष्ट दिसला नाही. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर महामार्गावरून सातारा बाजूकडे सुसाट निघून गेले.नंदकुमार ननावरे यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय द्वेषातून हल्ला झाला की अन्य कारणातून, याचा पोलिस शोध घेत आहेत. नागठाणे, बोरगाव तसेच परिसरातील सीसीटीव्हीची तपासणीही पोलिसांकडून सुरू आहे.