शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा गोळीबार; टोळीयुद्ध पेटले

By admin | Updated: January 13, 2015 01:02 IST

चांदणी चौक गोळीबार प्रकरण अद्याप शांत झाले नाही, तोच सोमवारी सायकांळी ४ वाजताच्या सुमारास शेख जफरचा साथीदार आरीफ लेंड्यावर १० ते १२ हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला

अमरावतीतील घटना : उपमहापौरा साथीदार आरीफ गंभीर; तिघांना अटकअमरावती : चांदणी चौक गोळीबार प्रकरण अद्याप शांत झाले नाही, तोच सोमवारी सायकांळी ४ वाजताच्या सुमारास शेख जफरचा साथीदार आरीफ लेंड्यावर १० ते १२ हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला करुन दोन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात आरीफ लेंड्या गंभीर जखमी झाला असून त्यांच्या नातेवाईकांनी हल्लेखोरांवर दगडफेक केल्याने हल्लेखोर दुचाकी सोडून पसार झाले. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून परिसरात तगडा बंदोबस्त केला आहे. चांदणी चौक गोळीबार प्रकरणातील शेख जफरचा साथीदार सैयद आरीफ ऊर्फ लेंड्या सैयद साबीर (४२) गुलिस्तानगरातील रहिवासी आहे. एक आठवड्यापूर्वीच आरीफ लेंड्या जामिनवर बाहेर आला. माहितीनुसार गुलिस्तानगरात आरीफ लेंड्याचा भाऊ राहत असून त्यांच्या मुलीचे रविवार लग्न झाले. दुसऱ्या दिवशी यवतमाळात रिसेप्शन असल्यामुळे सर्व नातेवाईक सायंकाळी ४ वाजता तयारीत लागले होते. यावेळी आरीफ लेंड्या भावाच्या दुकानासमोर मोबाईलवर बोलत होता. सलमानने पाहिली गोळीबारची घटनाआरीफ लेंड्याचा नातेवाईक सलमान नावाचा युवक त्यावेळी घराबाहेर उभा होता. त्याने आरडाओरड केल्याने नागरिक बाहेर आले. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे क्युआरटी पथकासह घटनास्थळी पोहचले. सलमानने घटनेची माहिती दिली. सहायक आयुक्त एल.एन.तळवींनी नागपुरी गेट ठाण्यात त्याचे बयाण नोंदविले. आज जफरच्या जामिनावर सुनावणीचांदणी चौक गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार उपमहापौर शेख जफर याच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी सुनावणी होणार आहे. आरीफ लेंड्यावर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी शेख जफर हा नागपुरी गेट पोलीस ठाण्यात उपस्थित होता. जुन्या वैमनस्यातून झाला हल्लाजुन्या वैमन्स्याहून आरीफ लेंड्या यांच्यावर हल्ला करण्यात आला, असा अंदाज प्राथमिक चौकशीत समोर आला आहे. चांदणी चौक गोळीबार प्रकरणात झालेल्या गोळीबारात आरीफ लेंड्याचा सहभाग होता. कारागृहातून बाहेर आल्यावर सोमवारी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३०७, १४३, १४७, १४८, आणि ३, २५ आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.