शहरं
Join us  
Trending Stories
1
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
2
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
3
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
4
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
6
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
7
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
8
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
9
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
10
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
11
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
12
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
13
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
14
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
15
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
16
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?
17
AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर!
18
आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
19
शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?
20
मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही...

कसारा घाटात आॅइल कंटेनरला आग

By admin | Updated: July 4, 2014 06:17 IST

गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास कसारा घाटात आॅइल घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतल्याने मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक चार तास विस्कळीत झाली.

कसारा : गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास कसारा घाटात आॅइल घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतल्याने मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक चार तास विस्कळीत झाली.तुर्भ्याहून नाशिककडे आॅइलचे ड्रम घेऊन जाणारा कंटेनर कसारा घाट चढत असताना अचानक त्याच्या केबिनमागून धूर येऊ लागला. प्रसंगावधान राखून चालक विजय चौहान कंटेनर रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने अचानक पेट घेतला. कंटेनर पेटत असल्याचे लक्षात येताच चालकाने उडी मारून जीव वाचवला. या घटनेची माहिती मिळताच कसारा वाहतूक पोलिसांनी बचाव कार्य सुरू केले.या घटनेमुळे नाशिककडे जाणाऱ्या गाड्या कंटेनरपासून ५०० मीटर दूरवर उभ्या केल्याने पुढील अनर्थ टळला. कंटेनरने उग्र रूप धारण केल्याने कसारा पोलिसांनी गॅमन इंडिया व महिंद्रा कंपनीच्या अग्निशामक गाड्यांना पाचारण केले. तब्बल चार तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. कंटेनरची आग इतकी भयानक होती की, दूरवरच्या झाडांसह कंटेनरही पूर्णत: जळून खाक झाला.कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यशवंत सोलसे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनावणे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह पहाटे ५.४० पासून घटनास्थळी दाखल होते. त्यामुळे नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक लतीफवाडीहून पर्यायी रस्त्याने सोडण्याची व्यवस्था ते करीत होते. मात्र, वाहनांची संख्या जादा असल्याने कसारा घाटात सुमारे २०० ते ३०० गाड्या अडकून पडल्या होत्या. तब्बल चार तासांनंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. नवीन कसारा घाटात दुहेरी मार्ग अप-डाऊन सुरू केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, कसारा घाटात अडकून पडलेल्या वाहनचालकांचे हाल झाले. (प्रतिनिधी)