शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

आयआरएफ आणि नाईक विरोधात गुन्हा दाखल

By admin | Updated: December 31, 2016 03:11 IST

बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक आणि त्यांची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) संस्थेविरोधात अंमलबजावणी

मुंबई : बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक आणि त्यांची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) संस्थेविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे नाईक यांच्या अडचणी वाढल्या आहेत.बांगलादेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी हा झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावित होता. त्यामुळे बांगलादेशात झाकीर नाईकच्या पीस टीव्हीवर बंदी घालण्यात आली. याशिवाय भारतातही हे चॅनेल बंद करण्यात आले. त्यांच्या भाषणांतून मुस्लिम तरूणांना दहशतवादासाठी प्रोत्साहीत करत असल्याचे आरोप, तक्रारी होत होत्या. चौकशीअंंती केंद्रीय मंत्रिमंडळाने या संस्थेवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. मुंबई पोलिसांसह एनआयए, एटीएस, ईडी या तपास यंत्रणा नाईक यांच्या संस्थेच्या हालचालींवर नजर ठेऊन आहेत. एनआयएने याप्रकरणी युएपीए कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करत संस्थेच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. संस्थेच्या आर्थिक व्यवहारसह नाईक यांच्या भाषणांच्या प्रती, महत्वाची कागदपत्रे, दस्तऐवज, आणि अन्य पुरावे तपास यंत्रणांनी गोळा करण्यास सुरूवात केली आहे. ईडीने झाकीर नाईक आणि आयआरएफ विरोधारत पीएमएलए कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांतर्गत कोट्यावधी रुपायांच्या आर्थिक व्यवहार, संस्थेला आलेले फंड, केलेला खर्च या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी चौकशी होणार आहे. झाकीर नाईक आणि आयआरएफच्या विविध बँक खात्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे.