शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
2
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
3
आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?
4
ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव
5
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
6
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
7
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
8
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
9
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
10
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
11
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
12
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
14
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
15
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
16
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
18
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
19
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
20
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?

गुप्तचर खात्यातील उणिवेवर ठेवले बोट

By admin | Updated: October 18, 2015 01:47 IST

गुप्तचर खात्यात संपूर्ण सेवा याच विभागात होईल, अशा मनुष्यबळाची गरज आहे, असे स्पष्ट मत मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी शनिवारी विशेष वार्तालापात व्यक्त केले.

मुंबई : गुप्तचर खात्यात संपूर्ण सेवा याच विभागात होईल, अशा मनुष्यबळाची गरज आहे, असे स्पष्ट मत मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी शनिवारी विशेष वार्तालापात व्यक्त केले. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकण्याचा जो प्रकार झाला, त्याच्या पार्श्वभूमीवर अहमद यांचे हे मत लक्षणीय आहे. काही काळापूर्वी गुप्त वार्ता (इंटेलिजन्स) विभागात अनुभव घेतलेल्या पोलिसांची राज्यात कोठेही बदली झाली, तरी त्यांच्या कामाचे स्वरूप बदलत नव्हते. पण आताशा या विभागातून त्यांची अन्य विभागात बदली होते. परिणामी त्याच्या गुप्त वार्तांकनातील अनुभवाला पोलीस खाते मुकते, यावर आयुक्तांनी अप्रत्यक्षरीत्या बोट ठेवले. गुप्त वार्ता विभागात नेमणूक झालेल्यांची सेवा थेट निवृत्तीपर्यंत याच विभागात ठेवण्याची व्यवस्था निर्माण होण्याचे संकेतही जावेद यांच्या मतातून मिळाले आहेत. डान्सबारवर घालण्यात आलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. त्याबाबत ते म्हणाले की, संपूर्ण आदेश वाचल्यानंतरच भविष्यात काय करता येईल याची योजना आखली जाईल. या मुद्यावर सरकरची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा सखोल अभ्यास करू. एकदा नियम तयार करण्यात आल्यानंतर त्यांच्यासमोर येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न केले जातील, असे जावेद यांनी स्पष्ट केले. सुधीन्द्र कुलकर्णी प्रकरणी जे काही घडले ते मुंबई पोलिसांच्या गुप्तचरांचे अपयश होते काय? असे विचारले असता जावेद म्हणाले की, संभाव्य घटनांबाबत गुप्तचर माहिती देतच असतात. कसुरी यांनी मणी भवन, जिना हाऊस आणि नेहरू सेंटरला भेट दिली होती. त्यापूर्वीच गुप्तचरांनी माहिती जमा केली होती; मात्र तो कार्यक्रम शांततेत पार पडल्याबद्दल आयोजकांनी आमचे आभारही मानले होते. दहशतवादविरोधी पथकातील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या वेतनवाढीप्रमाणे स्पेशल ब्रॅचमधील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ का दिली नाही? असे विचारले असता जावेद म्हणाले की, अतिरिक्त वेतनवाढ ही प्रोत्साहनात्मक असते. ही सरकारची धोरणात्मक बाब आहे. त्याबाबत मी बोलणार नाही. (प्रतिनिधी)सौदी अरेबियात अहमद राजदूत होणारजानेवारीत सेवानिवृत्त झाल्यानंतर जावेद यांची सौदी अरेबियात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या तरीही स्वत: जावेद यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, भविष्यात आपली कोठे नियुक्ती होईल याबाबत अंदाज बांधण्यात मला रस नाही. तसे मला आवडणारही नाही. याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनी मीच चकित झालो आहे. या मुद्यावर अंदाज बांधणे मला आवडणार नाही.