शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम वाऱ्यावर

By admin | Updated: August 23, 2016 01:53 IST

राज्यातील शाळा सुरू होणार दोन महिने उलटले असून, अद्याप शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी ठोस उपाययोजनेची घोषणा झालेली नाही.

मुंबई : राज्यातील शाळा सुरू होणार दोन महिने उलटले असून, अद्याप शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी ठोस उपाययोजनेची घोषणा झालेली नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी गेल्या वर्षी आक्रमक झालेला शिक्षण विभाग यंदा मात्र उदासीन भूमिकेत दिसत आहे.शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्यासाठी स्थानिक सामाजिक संस्था आणि संघटनांची मदतही शासनाने घेतली होती. मात्र, यंदा ठोस कार्यक्रमाची घोषणा झाली नसल्याने हजारो मुले शिक्षणापासून वंचित असल्याचा आरोप संघर्ष वाहिनीचे संघटक मुकुंद आडेवार यांनी केला आहे.गेल्या वर्षी सुमारे ६० हजार शाळाबाह्य मुलांचा शोध घेतल्याचा दावा शासनाने केला होता. मात्र, त्यातील ५० टक्के मुलांनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सरकारला आणता आले नाही, असे आडेवार यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, शासनाने शोधलेल्या शाळाबाह्य मुलांचे नेमके काय झाले? त्यांच्यासाठी कोणता कार्यक्रम सुरू आहे? या संदर्भातील अहवाल अद्याप जाहीर केलेली नाही. या संदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.न्यायालयाने मागितलेल्या अहवालात सरकारला शाळाबाह्य मुलांची नेमकी आकडेवारी आणि या मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठी काय उपाययोजना करणार? याची माहिती सादर करावी लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशाला दोन आठवडे पूर्ण होत आले असूनही सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचे नेमके काय करायचे आहे? असा सवालही मुकुंद आडेवार यांनी केला आहे.