शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

नद्या स्वच्छ करण्यासाठी पर्याय शोधा

By admin | Updated: September 23, 2016 04:41 IST

बई महापालिका, एमएमआरडीए नद्यांच्या स्वच्छतेबाबत काहीच पाऊल उचलत नसल्याने मुंबईतील नद्यांची दैना झाली आहे.

मुंबई : मुंबई महापालिका, एमएमआरडीए नद्यांच्या स्वच्छतेबाबत काहीच पाऊल उचलत नसल्याने मुंबईतील नद्यांची दैना झाली आहे. नद्यांमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडल्याने व त्यामध्ये कचरा टाकल्याने रोगांना आमंत्रण देण्यात येत आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने महापालिका व एमएमआरडीएला नद्या स्वच्छ करण्यासाठी तत्काळ पर्याय शोधण्याची सूचना केली.प्रत्येक वर्षी मुंबईच्या रस्त्यांवर पाणी तुंबत असल्याने व तुंबलेल्या पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याने महापालिका, एमएमआरडीए आणि राज्य सरकारला यावर उपाय शोधण्याचे व प्रतिबंधक उपाययोजना आखण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी व्यवसायाने वकील असलेले अटल दुबे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केली आहे. जुलै २००५ च्या महाप्रलयानंतर महापालिकेने मिठी नदीचा गाळ व नदीतील दगड बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. मात्र नॅशनल एनव्हायर्नमेंटल इजिनियरींग रिसर्च इन्स्टिट्युटने (नीरी) मिठीबद्दल सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे, की दरदिवशी मिठीमध्ये कितीतरी टन कचरा टाकण्यात येतो. मिठी नदीची खोली १६ फुट आहे. मात्र आता ती सात फुटही नाही, अशी माहिती यचिकाकर्त्यांचे वकील एस. सी. नायडू यांनी उच्च न्यायालयाला दिली. ‘ही अत्यंत धोकायदायक परिस्थिती आहे. हे जर खरे असेल तर सर्व संबंधित प्रशासनांनी अधिकारक्षेत्रावरून वाद न घालता तत्काळ बैठक घेऊन पर्याय शोधावा. हा चिंतेचा विषय आहे,’ असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने म्हटले. ‘संबंधित प्रशासन आपले कर्तव्य पार पाडत नसल्याने मुंबईतील नद्यांची दैना झाली आहे. नद्यांमध्ये कचरा टाकल्याने मुंबईत पाणी साठते आणि त्यामुळे चिकनगुनिया, डेंग्यु यांसारखे साथीचे आजार पसरत आहेत,’ असेही निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. नद्या स्वच्छ करण्यासाठी तातडीने उपाययोजना आखा, अशी सूचना उच्च न्यायायालयाने महापालिका व एमएमआरडीएला करत नीरीने केलेल्या शिफारशींवर विचार करून युद्धपातळीवर त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही दिले. (प्रतिनिधी)