शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

खुनामागील मास्टरमाइंड शोधा

By admin | Updated: September 18, 2015 00:43 IST

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाशी संबंधित संशयित समीर गायकवाड याला पोलिसांनी पक डले आहे, ही समाधानाची बाब आहे. आता तरी या प्रकरणातील मास्टरमाइंड

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाशी संबंधित संशयित समीर गायकवाड याला पोलिसांनी पकडले आहे, ही समाधानाची बाब आहे. आता तरी या प्रकरणातील मास्टरमाइंड शोधण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. सनातन्यांच्या मास्टरमाइंडची चौकशी व्हावी, या संघटनेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी स्मिता पानसरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. पानसरे म्हणाल्या, या खुनामागे सनातनी शक्ती असल्याचे सर्व पुरोगामी संघटनांनी वारंवार ठासून सांगितले होते; पण पानसरेंची हत्या ही टोल, बांधकाम कामगार संघटनेतील वाद आणि मालमत्तेच्या वादावरून झाल्याचा प्रसार करण्यात आला. पोलीसही त्याच पद्धतीने तपास करीत होते.अखेर आमचा रोख खरा ठरला आहे. पोलीस किमान संशयिताला अटक करण्यात का असेना, पण यशस्वी झाले आहेत. आता पोलिसांनी या प्रकरणातील सनातन्यांच्या मास्टरमाइंडला शोधण्याच्या दृष्टीने राजकीय दबावाला बळी न पडता तपास करावा, अशी अपेक्षाही स्मिता पानसरे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)हिंदुत्ववाद्यांनी कोणाचे हित केले ?हिंदुत्वाचे रक्षण करण्याचा आव आणणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना या मूठभरांचे हित साधत आहेत. या धर्मातील तळागाळातील लोकांची उन्नती करण्यासाठी या संघटनांनी काय केले आहे, याचा विचार आता सर्वसामान्य हिंदू नागरिकांनीच करावा, असे आवाहनही स्मिता पानसरे यांनी केले. मुख्यमंत्री मौन का?पोलिसांनी पकडलेला संशयित समीर गायकवाड हा सनातनी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सिद्ध झालेले आहे, पण तरीही सनातन्यांची चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मौन का बाळगून आहेत, असा सवालही स्मिता पानसरे यांनी केला.